शाळा प्रवेश दिनानिमित्त अभिवादन

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्राथमिक शाळेत प्रवेश दिनानिमित्त कासरूड येथील विहाराच्या प्रांगणात मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी समाजप्रबोधन मंडळाचे संस्थापक अनिल वीर,भारतीय बौद्ध महासभेचे सचिव अनिल सपकाळ,ज्येष्ट मार्गदर्शक दशरथ मोरे,यशवंत मोरे,शंकर कदम आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
             नुतन विहाराचे बांधकाम कासरूड येथे सुरू आहे.त्यास भेट देऊन अनिल वीर यांनी रु.४,०००/- देणगी समाजप्रबोधन मंडळाकडे सुपूर्द केली. शासनाच्यावतीने विहाराचे काम सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.मात्र, अधिकचे चांगल्या प्रतीचे काम व्हावे.या हेतुने अधिकचा निधी एकत्रीत केला जात आहे.
    सातारा येथे बाबासाहेब यांनी शाळेत प्रवेश घेतला होता.तेव्हा त्यांचे नाव भिवा  होते. त्याची नोंद शाळेतील दस्तऐवजमध्ये आहे. नोंद वहीत “१९१४” क्रमांका समोर आजही बाळ भिवाची स्वाक्षरी असलेले ऐतिहासिक दस्तऐवज प्रतापसिंह हास्कूल या शाळा प्रशासनाने जपून ठेवलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतापसिंह हास्कूल या शाळेत पहिले पाऊल पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले. त्याचमुळे असंख्य वंचित, दुर्लक्षित बहुजन वर्गाचे उद्धारकर्ते ठरले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेल्यामुळेच त्याचे लिखित भारतीय संविधानाचा संपूर्ण जगात गौरव होत आहे.त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.त्यामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस अत्यंत महत्वाचा आणि वंचित, दुर्लक्षित, बहुजन समाज यांच्या करीता ७ नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक आणि  क्रांतिकारी ठरतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला विद्या व्यासंग शेवटपर्यंत जपला.उच्च दर्जाची विधवत्ता व ज्ञान असतांनाही आजन्म विद्यार्थी राहिले व आदर्श विद्यार्थी ठरले. त्यामुळे विद्यार्थी प्रवेश दिनाला अतिशय महत्व प्राप्त होते.म्हणून महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी परिपत्रक द्वारे विद्यार्थी दिवस घोषित केलेला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला