निराधार,वयोवृद्ध, दिव्यांग आदींच्या पेन्शनमध्ये दुप्पटीने वाढ करावी

सातारा ;  जिल्ह्यातील संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेसह तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना बंद झाली आहे.तेव्हा ती पूर्ववत करून दुप्पट करावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच आंदोलन छेडण्यात आले. 
             महाराष्ट्र व केंद्र शासनाने आत्तापर्यंत सबविलेल्या निराधार योजनेमार्फत हजारो निराधार लाभार्थ्याना लाभ मिळत असून या योजनेमार्फत निराधार व्यक्ती तसेच वयोवृद्ध लाभार्थी तसेच अंध व्यक्तीना या योजनेमार्फत मोठा आधार मिळत आहे. परंतु अलिकडील वर्षामध्ये या योजनेची मदत मिळत नाही. त्यामुळे निराधार व्यक्तीचे तसेच वयोवृध्द व्यक्तीचे फार मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यांना योजनेच्या मदतीची वाट पाहावी लागत आहे. पेन्शनच्या आधारावर उधार औषधे घेण्याची वेळ या निराधार लाभार्थ्यावर येत आहे.तेव्हा या निराधार लोकांचे लक्ष वेधण्यासाठी  ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येनी उवस्थित होते. तेव्हा दरमहा वेळेवर निराधार पेन्शन मिळावी.शिवाय, प्रतिमाह रू. १००० /- लाभार्थी याना अपुरी पडत असल्याने पेन्शनमध्ये दुप्पटीने वाढ करावी. तेव्हा  गांभिर्याने शासनाने लक्ष्य द्यावे.अशीही मागणी होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला