शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
आरोपींना तत्काळ अटक करा ; पोलीस पाटील संघटना आक्रमकSatara News Team
- Sat 9th May 2026 07:34 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : खटाव तालुक्यातील शेडगेवाडी गावचे पोलीस पाटील संतोष शेडगे यांच्यावर काल सकाळी गावातील काही गावगुंडाने घरासमोर येऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून याबाबत मायणी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पाटील संतोष शेडगे यांना पुढील उपचारासाठी सातारा या ठिकाणी नेण्यात आले आहे.
शेडगेवाडी ता. खटाव येथील कार्यरत असणारे पोलीस पाटील संतोष शेडगे यांच्यावर गावातील काही गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेला प्राण घातक अत्यंत गंभीर घटना असून याबाबत पोलीस पाटील यांच्यामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस पाटील हे शासन व पोलीस प्रशासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून गावांमध्ये काम करत असतात गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सातत्याने गावात कार्यरत असतात अशा जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीवरच जीव घेणे हल्ला ही अत्यंत गंभीर घटना आहे.
याबाबत घडलेल्या घटनेमधील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आज वडूज पोलीस ठाणे या ठिकाणी एकत्र येत आक्रमक भूमिका घेण्यात आले व घडलेल्या घटनेबाबत निवेदन देण्यात आले तसेच त्या ठिकाणी पोलीस पाटील संतोष शेडगे व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक संरक्षण देण्यात यावे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत साहेब यांच्याशी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने चर्चा करून घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली.
पोलीस पाटील यांच्यावर गावातील गावगुंडांकडून करण्यात आलेला जीवघेणा हल्ला ची घटना अत्यंत गंभीर असून गावातील महत्त्वाच्या जबाबदार पदावर काम करत असलेले तसेच कायदा व सुव्यवस्था राखत असणाऱ्या पोलीस पाटलांवरील आल्याबाबत गाव कामगार पोलीस पाटील सातारा जिल्ह्याच्या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन त्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे तसेच लवकरच सर्व पोलीस पाटील सातारा पोलीस अधीक्षक यांना भेटून घटनेची दखल घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष- आप्पासो गायकवाड
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 9th May 2026 07:34 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 9th May 2026 07:34 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 9th May 2026 07:34 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 9th May 2026 07:34 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 9th May 2026 07:34 pm
संबंधित बातम्या
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Sat 9th May 2026 07:34 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 9th May 2026 07:34 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 9th May 2026 07:34 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 9th May 2026 07:34 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 9th May 2026 07:34 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sat 9th May 2026 07:34 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sat 9th May 2026 07:34 pm










