छत्रपती शाहू जन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचे आज साताऱ्यात स्वागत

येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांची माहिती

सातारा : धर्मवीर संभाजी महाराज यांचे सुपुत्र व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जन्मोत्सवानिमित्त जन्मभूमी ते कर्मभूमी असा भव्य पालखी सोहळा आयोजित गांगवली ( जि रत्नागिरी ) ते सातारा करण्यात आला आहे . या पालखी सोहळ्याचे स्वागत दिनांक 18 मे रोजी सायंकाळी सहा वाजता साताऱ्यातील शिवतीर्थ येथे होणार आहे याची माहिती येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष छत्रपती, थोरले शाहू महाराज पालखी सोहळ्याचे समन्वयक सुहास राजेशिर्के यांनी दिली आहे 

छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी सातारा शहराची स्थापना केली म्हणूनच सातारा नगरीला शाहूनगरी असे संबोधले जाते . मात्र त्यांच्या स्मृती जागवणारे कोणतेही ऐतिहासिक चिन्ह सातारा शहरात नाही .त्यामुळे येसूबाई फाउंडेशन आणि छत्रपती शाहू महाराज थोरले समन्वयक समितीच्या वतीने जन्मभूमी ते कर्मभूमी अशी संकल्पना घेऊन गांगवली ते सातारा असे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . यंदा सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे शनिवार दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे पोवई नाका शिवतीर्थ येथे आगमन होणार आहे . साताऱ्यातील शाही घराण्याचे वारसदार यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते .

पोवई नाक्यावर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे . सातारा नगरीची भूषण व 12 व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारी धैर्या विनोद कुलकर्णी हिचा विशेष सत्कार होणार आहे . या पालखीचा भव्य स्वागत सोहळा ही सातारकरांसाठी पर्वणी असणार आहे , सर्व नागरिकांनी या पालखी सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे . माणगाव रायगड पोलादपूर महाबळेश्वर मेढा मार्गे साताऱ्यात दाखल होणार असून ठिकठिकाणी पालखीचे भव्य स्वागत होणार आहे .

 छत्रपती शिवरायांना अभिवादन करून येथून हा पालखी सोहळा छत्रपती शाहू महाराजांची समाधी असणाऱ्या क्षेत्र माहुली येथे जाणार आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त