दूषित पाण्याने निरा नदीतील मासे मृत होळ येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

फलटण : होळ ता फलटण येथील ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त  पाण्यामुळे मागील आठ दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडले असून  संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप  प्राप्त झाले आहे. नदीचे पाणी  पूर्णपणे दूषित झाले आहे यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.निरा नदी पाणी दूषित तक्रारीबाबत मागील वर्षी  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी केली होती. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या टीमने पाहणी सुद्धा केली होती. याबाबत भाजपने विषयाला गांभीर्याने घेतले होते व नदी प्रदूषणाला केवळ साखर कारखानेच जबाबदार नसून बारामती, फलटण तालुक्यांतील कारखान्यांसह अन्य कंपन्या जबाबदार आहेत असा आरोप नदीलगतच्या शेतकऱ्यांनी केला होता.

बारामती आणि फलटण या दोन तालुक्यांच्या सीमेवरून नीरा नदीचे पात्र वाहत आहे. परंतु खासगी व सहकारी प्रकल्पातील रसायन मिश्रित सांडपाण्याने गेली अनेक वर्षे नीरा नदीतील पाण्याचे प्रदूषण होत आहे. विशेषतः शेती उद्धवस्त करणारे हे प्रदूषण रोखणे आव्हाणात्मक ठरत आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदी लगतच्या ग्रामपंचायतींसह शेतकऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केल्याच्या नोंद आहेत. परंतु संबंधित मंडळाने फारशी दखल न घेतल्याने यंदाही नदीमध्ये प्रचंड प्रदुषित पाणी वाढत चालले आहे.रसायन मिश्रित व मळी मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओढ्याद्वारे नदीत सोडले जात असल्याने नदीतील पाण्याला काळा रंग चढायला लागला असून पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. तसेच मासेही मोठ्या प्रमाणात मृ्त्युमुखी पडत आहेत. याशिवाय नदीच्या खराब पाण्यामुळे नदी काठच्या जमिनीवर क्षाराचे थर येऊन ती नापीक होत आहे. पिकांची वाढ खुंटत आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत चालला आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालास तर याला जबाबदार कोण? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात दूषित पाणी निरा नदीत सोडल्या बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का? असा सवाल होळ येथील ग्रामस्थ विचारत असून या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसुद्धा असह्य झाले असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.सद्यस्थितीत राज्यात नदी प्रदूषण हा  मुद्दा गाजत असताना नीरा नदीत प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडून पाणी दूषित झाल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी राज्य सरकार कोणती कडक भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त