महादेव चव्हाण यांच्या संघर्षपूर्ण जीवनाची कथा

सातारा : प्रचंड आत्मविश्वास त्याच्या जोडीला चिकाटी असेल तरी संघर्षाच्या जिवन गाथेवर मात करता येते आणि जिवनाला चांगला आकार देता येतो याचे  उदाहरण म्हणजे कोपर्डे हवेली येथील अपंग प्राध्यापक महादेव चव्हाण  त्यांचा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कराड येथील नियत सेवा वयोमानानुसार सेवेचा कालखंड पूर्ण झाल्याने त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम कराड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कराड येथे संपन्न झाला. 
   महादेव चव्हाण यांचा जन्म एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला झाला.चव्हाण जन्मताच दोन्ही पायाने अपंग घरची परिस्थिती गरिबीची होती.पण स्वताच्या जिद्दीने गरिबीत शिक्षण घेऊन इलेक्ट्रिक इंजिनिअरची पदवी प्राप्त करुन सातारा येथील आयटी आय मध्ये शिक्षक म्हणून १९९५ ला सेवेस सुरवात केली.
   नंतर कराड येथे बदली होऊन आले त्यानंतर दोन वर्षे विटा येथे सेवा करून पुन्हा कराड येथील आयटी आय बदली होऊन आले दोन्ही पायाने अपंग असूनही त्यांनी संघर्षाच्या जिवनावर हसत खेळत मात केली.गणित आणि तथा चित्रकला या विषयाचे ज्ञानदानाचे काम केले हे करत असताना ते नेहमीच लाहान असणार्या लुना या दुचाकीने प्रवास करायचे किक मारताना आधाराला असणार्या काटीचा वापर करायचे.काटी सोडून त्यांचा प्रवास नसायचा अनेकवेळा ते तोल संभाळताना पडले जखमी झाले पण खचले नाहीत.
  ज्ञानदानाचे काम करत असताना त्यांनी पुर्ण क्षमतेने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या एक मुलगा आणि दोन मुली यांना अभियंते बनवले सतत संघर्ष शारीरिक असताना त्यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान होते.आपल्या सलग २८ वर्षाच्या सेवेतून ते निवृत झाले.नुकताच सेवानिवृत्त कार्यक्रम कराडच्या आयटी आय मध्ये संपन्न झाला यावेळी प्राचार्य पी बी देशमाने, उपप्राचार्य डी एम पाटील, संभाजी चव्हाण,प्रताप चव्हाण,अमोल चव्हाण आदिंची उपस्थिती होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला