खटाव येथे महिला आर्थिक विकास बचत गट यांच्या विद्यमाने हळदी कुंकू व महिला आरोग्य शिबिर कार्यक्रम

 पुसेगाव : महिला आर्थिक विकास बचत गट यांच्या विद्यमाने खटाव येथील इंदिरा नगर परिसरात मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.अनोख्या पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या या  शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना वाण म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हित हितकारक ठरेल असे शिबीर आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद भंडारे,अस्मिता सिएमआरसी व्यवस्थापक सीमा पुजारी, सहयोगिनी कोमल फडतरे व सिआरपी रेश्मा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनोखा सोहळा पार पडला.
   कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. डॉ. मिलिंद भंडारे यांनी उपस्थित महिलांना मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन व संस्थात्मक प्रसुती,ई-कार्ड,आभा कार्डचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय खटाव प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थित महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सीमा पुजारी यांनी ठराविक वयात महिलांना उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
     यावेळी विशेष पध्दतीने तिरंगा इंद्रधनुष्य थाळी तयार करण्यात आली. या निमित्ताने महिलांना फळे, भाज्या अन्नधान्य यांचे आहारातील महत्त्व व पोषण मूल्यांबाबत अवगत करण्यात आले.याशिवाय पाककला स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांनी पाककलेचे परीक्षण करून पोषण आहार बक्षिसांचे  विजेत्या महिलांना वितरण करून सन्मानित करण्यात आले. शिबिरात बचत गटाच्या विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.आरोग्य विभागाच्या नयन भातडे,अक्षया भिलारे ,वाय.डी.भोसले व आशा स्वयंसेविका रोहिणी झिरपे यांनी विशेष श्रम घेतले. सीआरपी रेश्मा शेख यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित बचत गटातील महिलांचे आभार मानले.अनोख्या पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

खटाव:मकरसंक्रांतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित अस्मिता लोकसंचलीत साधन केंद्र वडूज यांच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न झाले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला