वर्धनगड पुसेगाव भागासाठी राजकारणात असे तोपर्यंत विकासाची कामे करतच राहणार - आमदार शशिकांत शिंदे

पुसेगाव : आजपर्यंत आपण विकासाचीच कामे केली, आणि यापुढील काळातही वर्धनगड व पुसेगाव पंचक्रोशी साठी तुम्ही मागाल ते काम करण्यासाठी निश्चित प्रयत्नशील राहून विकासाभिमुख काम आपण सुरूच ठेवणार असून तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. मी विरोधात असूनही कोणाचेही काम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला नाही किंवा जिरवा जिरवीचे राजकारण केले नाही, फक्त आणि फक्त विकासाचे ध्येय ठेवले. असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
 वर्धनगड तालुका खटाव येथे महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडीच्या वतीने   विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ व महिलांसाठी हळदीकुंकू व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी वैशाली शिंदे, प्रदीप विधाते,राजेंद्र कचरे, सुरेशशेठ जाधव,गौरव जाधव,बाळासाहेब इंगळे, दगडूदादा शिंदे, जोतीनाना सावंत,संजयनाना चव्हाण,सचिन देशमुख, समिंद्रा जाधव, रुपेश चव्हाण, संतोष साळुंखे उपस्थित होते.
 आमदार शशिकांत शिंदे पुढे म्हणाले " वर्धनगड पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या किल्ल्याचा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा इतिहास परत एकदा जिजाऊच्या, सावित्रीच्या लेकीने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मावळ्याच्या उपस्थितीत उद्याचा कोरेगाव सातारा जिल्ह्याचा व महाराष्ट्राचा इतिहास उभा करण्याची धमक आजच्या या सभेतून व्हावी आणि यासाठी हा आजचा मेळावा महत्त्वाचा असल्याचे सांगून मी एक गरीब घरातला माथाडी कामगारांचा मुलगा कामगारांचे नेतृत्व करीत शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने गरिबीतून वरती आलेला कार्यकर्ता आहे. व मला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जाण आहे. जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत वर्धनगड व पुसेगाव पंचक्रोशीला व या भागाला काहीच कमी पडू देणार नाही, आज जी मला लढण्याची ताकद,जिद्द याच जनतेने निर्माण करून दिली आहे.
   आपण या परिसरासाठी अनेक कामे केली. व ती मंजुरीवर आणली अनेक कामांचा पाठपुरावा केला. आणि ते काम होतंय मार्गी लागतंय म्हटलं की, ते आम्हीच केलं असं म्हणणारी माणसं आहेत, नेहमी कोट्यावधीची भाषा करणारे  प्रत्येक गावात कोटीच्या खाली बोलतच नाहीत कधी कधी असं वाटतं महाराष्ट्राचे बजेट फक्त कोरेगाव आले  की काय, असेच वाटायला लागले आहे. काही हरकत नाही तुमची तुम्हाला लखलाभ असो.
 सध्या देशात महागाई प्रचंड वाढली आहे. आम्ही काही बोलत नाही,आमचा मुलगा कर्तत्ववान असावा, त्याचं भविष्य उज्वल असावं आम्ही त्याला उच्च लेवलला शिकवतो पण आज मुलं शिकून पडून आहेत. नोकरीचा पत्ता नाही, आम्ही शेतकऱ्याची मुले दिवसभर शेतात काबाडकष्ट करून मुलांना शिकवलं आणि आज मुला मुलींचे भवितव्य धोक्यात आहे. कुणीतरी यावर आवाज उचलणार आहे की नाही हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे.
 शरद पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिले.महिलांना आपला अधिकार देण्याचा प्रयत्न केला. सर्व शासकीय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसेच सरपंच सभापती या क्षेत्रात व झेंड्याची दोरी ओढून झेंडा फडकवण्याचा अधिकार दिला. त्याच राज्यात देशात धर्मा धर्माच्या नावावर फूट पाडून समाजामध्ये दरी पाडायची अशांतता निर्माण करायची असली घाण कांड कर्म करायची नको त्या केसेस मध्ये तरुण वर्ग अडकवायचा, पोलिसांच्या वर दबाव, मोखाट सुटले आहेत सगळे, पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला जात आहे. कुठल्याही प्रकारची भय भीती राहिली नाही, महिला भगिनी मुले सुरक्षित नाहीत, बेरोजगारी महागाई बेकारी वाढली आहे. आमचा देश हुकूमशाही कडे चालला आहे. छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात देशात गुण्या गोविंदाने  राहणाऱ्या समाजाला सुडाचं राजकारण कपटकारस्थान करून एखाद्याचं घर उध्वस्त करणारे हे सरकार बाजूला हटवण्याची वेळ तुमच्या हातामध्ये आहे. कांद्याला दर नाही कांद्याची निर्यात बंदी केली आहे. उसाला भाव नाही साखरेची निर्यात बंदी केली जाते. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बेरोजगारी बद्दल, ना जनता बोलाय तयार आहे ना कोणीच बोलाय तयार नाही, समाजामध्ये धार्मिक राजकारण करून समाजात दरी पाडण्याचा प्रयत्न केला जातोय,आज आपण हे काय बघतोय कधीतरी आपण याचा मनामध्ये विचार करा आज देशांमध्ये लोकशाही कुठे चालली आहे सर्वसामान्य माणसाची लोकशाही कुठे आहे. आता माझ्या माय भगिनींना विचार करायला लावणारी आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र वरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये शिवसेनेचे सरपंच अर्जुन मोहिते यांनी आपल्या दहा वर्षाच्या कारकीर्दीतील आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल जनतेसमोर संपूर्ण मुद्देसूद माहिती दिली. यावेळी सौ वैशाली ताई शिंदे यांनी महिलांचा हळदीकुंकू, व अदिती पवार यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला व आपले विचार व्यक्त केले. तसेच प्रदीप विधाते यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास हजारो महिलांची उपस्थिती प्रेक्षणीय होती. महिलांमधूनही शशिकांत शिंदे की जय च्या घोषणा देण्यात येत होत्या यावेळी परिसरातून आलेले विकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते वर्धनगड व पंचक्रोशीतील कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अर्जुन कुंभार, प्रल्हाद सावंत, शंकर अनपट, पोपटराव चव्हाण, विठ्ठल पाचांगणे सुलतान भालदार  अभिजीत पाचांगणे, सागर गायकवाड, अक्षय अनपट, संतोष कुंभार, कुलदीप घोरपडे, आयुब शिकलगार किसन घोरपडे,तानाजी मोरे, बाळू जठार, विठ्ठल रोकडे,परशुराम शिंदे, धनाजी शेटे, मंगेश चव्हाण, तेजस पाचांगणे यांनी मोलाचे सहकार्य केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त