नागठाण्यातील गुरु शिष्य मेळावा उत्साहात

देशमुखनगर : येथील श्रीरामकृष्ण विद्यालयातील माजी विद्यार्थी अन् त्यांना घडवणारे शिक्षक यांचा 'गुरु- शिष्य स्नेहमेळावा' उत्साहात झाला. त्यानिमित्ताने 1984- 85 मधील इयत्ता दहावीचे विद्यार्थी अन् तेव्हाचे शिक्षक एकत्र आले.

बोरगाव (ता. सातारा) येथे या अनोख्या अन् आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या वेळी उपस्थित गुरुजनांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गोैरव करण्यात आला. मेळाव्यास 30 गुरुजन अन् 55 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा शाळेची प्रार्थना, ओळख परिचय, बालपणीच्या शालेय आठवणी, अल्पोपहार, स्नेहभोजन, कलाविष्कार यासारखे उपक्रम राबविण्यात आले. आदिनाथ वेळापुरे यांनी संयोजन केले. यशस्वीतेसाठी डाॅ. विकास घाडगे, विनोद उत्तेकर, शिवलिंग दळवी, जयवंत जाधव तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला