कुस्तीचे पितामह साहेबराव पवार आणि कुस्तीतील महाबली पैलवान सतपाल यांची भेट
साताऱ्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सहकार्य करण्याचे सतपाल यांचे आश्वासनSatara News Team
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
- बातमी शेयर करा
मेढा : मराठमोळ्या कुस्तीचे पितामह साहेबराव पवार आणि कुस् / प्रतिनितीला नावलौकिक मिळवून देऊन देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावणारा महाबली सतपाल यांची आज साताऱ्यात भेट झाली कुस्ती क्षेत्रातील दोन दिग्गज एकमेकांना भेटले आणि दोघांच्यात गप्पा झाल्या सातारच्या मातीत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल होण्यासाठी आणि त्या संकुलात नामवंत पैलवान घडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन सतपाल यांनी पवार यांना दिले.साहेबराव पवार यांनी महाबली सतपाल यांचे सातारच्या भूमीत भव्य स्वागत केले.
वयाच्या ९९ व्या वर्षी कुस्ती क्रीडा क्षेत्राची सेवा करत असलेले ज्येष्ठ क्रीडा महर्षी सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांची विशेष भेट घेण्यासाठी महाबली पैलवान सतपाल आज साताऱ्यात आले होते.एक कुस्तीचे पितामह आणि एक कुस्तीतील महाबली अशा दोन दिग्गजांची भेट झाली.आजच्या कुस्तीबाबत दोघात चर्चा झाली.
साताऱ्यामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती संकुल यासाठी निश्चितपणे मी माझी वर्षातले काही महिने देण्यास तयार आहे असे आश्वासन महाबली सतपाल यांनी साहेबराव पवारांना दिले.या मातीत नामवंत पैलवान घडवण्यासाठी मी वेळ देणार असल्याचेही महाबली सतपाल म्हणाले
यावेळी देशामध्ये मोठा गौरव प्राप्त असलेले, महाबली सतपाल यांनी कुस्तीचा आणि कुस्ती क्षेत्राचा एक दर्जा राखला आहे.त्यानी आज पर्यंत देशाला फार मोठे पैलवान दिलेले आहेत आणि त्यांची कीर्ती यश असंच आबादीत राहो असा आशीर्वाद साहेबराव पवार यांनी दिला.सदर प्रसंगी अमर जाधव, संदीप साळुंखे, जीवन कापले, माणिक पवार, उप महाराष्ट्र केसरी आबा सुळ, चंद्रकांत सुळ, वैभव फडतरे, दीपक पवार, बलभीम शिंगरे, यश पवार, प्रा रुस्तुम तांबोळी, देशमुख सर मदन पवार व राजेश्वर पवार आदी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 13th Feb 2024 05:25 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 13th Feb 2024 05:25 pm













