प्रेम, लग्नाचे अमिष आणि अल्पवयीन मुली बेपत्ता

जिह्यातील अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे वाढले प्रमाण मुलींना समुपदेशन गरजेचे

सातारा  : 
अल्पवयीन मुली बेपत्ता होणे, फुस लावून पळवून नेणे अशा घटना गेल्या काही दिवसापासून सातत्याने घडत आहेत. या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत आहे. वयात येताना शारीरिक व मानसिकतेत होणारे बदल, मोबाईल, सोशल मिडिया, मैत्री यांचा वाढता प्रभाव मुलींना चुकीच्या दिशेने जाण्यास भाग पाडत आहेत. यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. चालु वर्षातील नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिह्यातून 206 मुली बेपत्ता झाल्या आहेत.सातारा शहर व जिह्यात गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. क्लास, कॉलेजला जाते, मैत्रिणीकडे जाते. असे सांगून या अल्पवयीन मुली घरातून निघून जातात. आणि बऱयाच वेळ झाला तरी परत येत नाहीत. यानंतर आई-वडील, नातेवाईंक यांनी शोध घेऊन त्या मिळून येत नाही. म्हणून संबंधित पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होते. काही दिवसांनी या मुली मिळून आल्यानंतर त्या प्रेम प्रकरणामुळे पळून गेल्याचे समोर येते. तर घरात भांडणे झाली असतील तर त्या निघून जातात. ही गंभीर बाब दिवसेंदिवस बनली आहे. वयात येणाऱया मुलींचे प्रेमबद्दल निर्माण होणारे आकर्षण त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. यातून लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत आहे. आपल्या मुलींना योग्य समुपदेशानाची गरज आहे. हे माहिती असताना भीतीपोटी पालक मुलीशी संवाद साधणे टाळत आहेत. मुलीबरोबर अल्पवयीन मुलेही बेपत्ता होत आहेत. चालु वर्षीच्या 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर पर्यंत जिह्यातून 206 मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर 157 मुलींना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. अजून 49 मुलींचा तपास सूरू आहे. मुलीपाठोपाठ मुलेही बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चालु वर्षी 36 मुले बेपत्ता झाली असून 32 मुलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. अजून 4 मुलांचा तपास सुरू आहे.  तपासात येतात अडचणीअनेक मुली प्रेमाच्या आकर्षणातून घरातून निघून जातात. पालकांकडून अशा प्रकारची माहिती बदनामीच्या भीतीने सुरूवातीला दडविण्याचा प्रयत्न होतो. पालकांकडून माहिती लपविण्याच्या प्रकारामुळे तपास यंत्रणेला योग्य दिशा सापडत नाही. मुलींचा मोबाईल अनेकदा बंद असतो. तर काही मुलींकडून नंबरच बदलून टाकलेला असतो. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस अनेकदा माग काढतात. मात्र जोपर्यंत सीमकार्ड ऍक्टिव्ह होत नाही. तोपर्यंत लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन जाते. जेव्हा प्रेमप्रकरणाची माहिती समोर येते. तेव्हा त्या मुलाचा पत्ता काढून त्याची माहिती घेत पोलिसांकडून त्याला टेस करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.  

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला