शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना पीएचडी जाहीर

शिक्षकांसाठी 'नवबोध सेवांतर्गत प्रशिक्षण प्रतिमान' केले विकसित.
PhD announced to Education Director Dinkar Patil
सर्व शिक्षा अभियान आल्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणावर खर्च होतो परंतु या प्रशिक्षणाचा शिक्षकांच्या व मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे असे काही वेगळे प्रशिक्षणाचे मॉडेल असावे जेणेकरून दोन्ही उद्देश साध्य होतील, या प्रेरणेतून राज्याला उपयोगी पडणारे संशोधन कार्य हाती घेतल्याचे संचालक पाटील यांनी सांगितले, तसेच विविध आयोगांनी शिक्षक प्रशिक्षणावर भर दिला आहे त्यात सेवांतर्गत प्रशिक्षण शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी ठरावे अशीही अपेक्षा विविध आयोगांनी व्यक्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांचे संशोधन कार्य राज्य शासनास सहाय्यभूत ठरेल असे आहे.

सातारा  : राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षणशास्त्रात पीएचडी जाहीर केली आहे. शालेय शिक्षणातील नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरलेल्या व  शिक्षकांसाठी अनिवार्य अशा सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी 'नवबोध सेवांतर्गत प्रशिक्षण प्रतिमान'हे मॉडेल त्यांनी संशोधनातून विकसित केले असून हे संशोधन कार्य त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी शिक्षण विभागास अनोखी भेट ठरणारे आहे.'प्राथमिक शिक्षण स्तरावरील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण प्रतिमान विकसन व त्याची परिणामकारकता' असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांनी डॉ. मेघा उपलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण व विस्तार विभागात शिक्षणशास्त्रात सर्वेक्षण व प्रायोगिक अशा दोन्ही पद्धतीचा वापर करून हे संशोधन कार्य पूर्ण केले.दिनकर पाटील यांनी शिक्षकांसाठी सद्यस्थितीत जी प्रशिक्षण व्यवस्था आहे तिचा अभ्यास करून त्या आधारे प्रशिक्षणाचे हे नवीन प्रतिमान विकसित केले आहे, यासाठी त्यांनी सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व शिक्षकांची मते जाणून घेतली. मॉडेलची परिणामकारकता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासली. यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील इयत्ता पहिलीच्या गणित शिकवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 40 शिक्षकांवर हा प्रयोग केला व तो यशस्वी ठरला.अनेक अध्यापन पद्धतींचे मिळून हे एक सर्व समावेशक मॉडेल तयार झाले असून स्वयंअध्ययन व कृती आधारित हे प्रतिमान आहे. शिवाय ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने या प्रतिमानाचा उपयोग करता येतो.त्यांच्या या नवविकसित प्रतिमानाचा फायदा  प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी होणार आहे. प्रशिक्षणाचा खर्च कमी होणार असून वेळेचीही बचत होणार आहे. कृती आधारित असल्याने प्रशिक्षण आनंददायी होणार असून प्रशिक्षणाची मूळ उद्दिष्टे सफल होण्यास मदत होणार आहे. याची अंमलबजावणी करता येणार असल्याने हे उपयोजित मॉडेल आहे. तसेच हे  गणित विषयाचे मॉडेल असले तरी अन्य सर्व विषयांसाठी व शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांनाही प्रशिक्षणासाठी हे उपयुक्त ठरेल असे दिनकर पाटील याबाबत म्हणाले.सर्व शिक्षा अभियान आल्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणावर खर्च होतो परंतु या प्रशिक्षणाचा शिक्षकांच्या व मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे असे काही वेगळे प्रशिक्षणाचे मॉडेल असावे जेणेकरून दोन्ही उद्देश साध्य होतील, या प्रेरणेतून राज्याला उपयोगी पडणारे संशोधन कार्य हाती घेतल्याचे संचालक पाटील यांनी सांगितले, तसेच विविध आयोगांनी शिक्षक प्रशिक्षणावर भर दिला आहे त्यात सेवांतर्गत प्रशिक्षण शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी ठरावे अशीही अपेक्षा विविध आयोगांनी व्यक्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांचे संशोधन कार्य राज्य शासनास सहाय्यभूत ठरेल असे आहे.दिनकर पाटील यांनी शिक्षक ते शिक्षण संचालक अशी वाटचाल केली असून राज्य परीक्षा परिषद, प्रौढ व अल्पसंख्यांक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, बालभारती, राज्य मंडळ, राज्य अभ्यासक्रम संशोधन व प्रशिक्षण परिषद(एससीईआरटी) आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय या शालेय शिक्षण विभागाच्या सर्वच संचालनालयात संचालक म्हणून काम केलेले ते एकमेव संचालक आहेत. सध्या योजना संचालनालयात ते नियमित संचालक असून प्राथमिक संचालनालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत, येत्या ऑगस्ट अखेरीस ते सेवानिवृत्त होत आहेत."हे उपयोजित मॉडेल असून त्याची लगेच अंमलबजावणी करता येणे शक्य होणार आहे, सदरचे संशोधन राज्यस्तरावर केले असल्याने राज्य शासनाला प्रशिक्षणाचे धोरण ठरवताना हे निश्चितच उपयोगी ठरेल अशी आशा आहे." - दिनकर पाटील, शिक्षण संचालक

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला