अजिंक्यतारा येथे लवकरच रोप वे च्या उभारणीची ग्वाही ना. नितिन गडकरी यांनी दिली
खा.श्री.छ.उदयनराजे यांच्या प्रयत्नांना यश
कोमल वाघ- Wed 27th Jul 2022 10:55 am
- बातमी शेयर करा
नवी दिल्ली : सातारा : नवी दिल्लीत येथे भुपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली यावेळी केंद्र शासनाच्या माध्यमातुन अजिंक्यतारा येथे उभारण्यात येणाऱ्या रोप वे बाबत विस्तृत चर्चा केली. लवकरच केंद्राच्या निधीतुन, नगरपरिषदेच्या मार्फत अजिंक्यतारा येथील रोप-वे च्या उभारणीस सुरुवात होईल. अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, किल्ले अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते किल्याच्या पूर्व भागाकडील खालची मंगळाई या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांचे परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजुंकडून आठ आसन क्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉलीचे आगमन निगमन होणार आहे त्याकरीता आवश्यक जागा उपलब्ध होत आहे. एकूण ९२ कोटी रुपयांच्या या केबल रोप-चे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीमधुन करण्यात येईल अशी ग्वाही भुपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे.
किल्ले अजिंक्यतारा या ऐतिहासिक वास्तुला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. याच किल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही काळ वास्तव्य होते. या किल्यावर सुमारे सात तळी असुन, या तळ्यातील झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न पर्यावरण आणि इतिहासप्रेमीं मदतीने केला जाणार आहे.
किल्यावरील राजसदरेचा चौथरा अद्याप मजबुत आहे, तसेच किल्यावर श्री मंगळाईदेवी मंदिर आणि दक्षिणाभिमुखी मारुतीचे मंदिर अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. किल्याच्या भक्कम असलेल्या प्रवेश व्दारापासून पायऱ्यांचा भाग तसेच तेथील बुरुज प्रेक्षणीय आहे. सुमारे ७० एकरापेक्षा जास्त भुभाग किल्याला लाभला असून, बहुतांशी भाग सपाट आहे. अनेक स्थित्यंतर पाहीलेल्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या अजिंक्यतारा किल्याचा सातारकरांचा अभिमान आहे.
किल्ले अजिंक्यताऱ्यावरच छत्रपती राजाराम महाराज यांनी रायगडावरुन, स्वराज्याची राजधानी स्थलांतरीत केली होती. जाज्वल्य इतिहास असलेल्या आणि ऐतिहासिक पाउलखुणा उमटलेल्या या किल्यावर आजही हजारो व्यक्ती, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि भाविक नेहमीच भेट देत असतात. नवरात्रातील सर्व दिवसांत किल्यावरील मंगळाईचे दर्शनाला
नेहमीच गर्दी होत असते.
परगांवचे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्यास भेट देण्यास उत्सुक असतात. किल्याच्या दरवाजापासून थोडीशी चढण आणि पायऱ्या असल्याने वयस्कर नागरीकांना आजही किल्यावर जाता येत नाही. केबल रोप वे मुळे या सर्वांना कमी वेळेत आणि कमी श्रमामध्ये किल्यावर जाता व येता येणार आहे. इतिहास तज्ज्ञांशी विचार करुन या किल्यावर ऐतिहासिक पर्यटन सुरु करण्याच्या कार्याला रोप-वे मुळे मदत व गती मिळणार आहे.
सातारा जिल्हा पर्यटनास मोठा वाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा या किल्यावर रोप-वे ची उभारणी केंद्राच्या निधीमधुन करण्यात येईल त्याबाबतची कार्यवाही लवकरच आपणास अवगत केली जाईल अशी ग्वाही देखिल ना. नितिन गडकरी यांनी दिली आहे.
Udayanraje
nitingadkari
aajikaytara
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 27th Jul 2022 10:55 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 27th Jul 2022 10:55 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 27th Jul 2022 10:55 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 27th Jul 2022 10:55 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 27th Jul 2022 10:55 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 27th Jul 2022 10:55 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सौ.काजलताई नांगरे पाटील मैदानात
- Wed 27th Jul 2022 10:55 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Wed 27th Jul 2022 10:55 am
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Wed 27th Jul 2022 10:55 am
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 27th Jul 2022 10:55 am
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 27th Jul 2022 10:55 am
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Wed 27th Jul 2022 10:55 am
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Wed 27th Jul 2022 10:55 am
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Wed 27th Jul 2022 10:55 am











