पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सौ.काजलताई नांगरे पाटील मैदानात

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी हा जिल्हा परिषद गट सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. याठिकाणी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने (शिंदे सेना) खाते खोलण्याचा जोरदार प्रयत्न करत सौ. काजल सुभाष नांगरे पाटील यांना उमेदवारी देत मास्टर स्ट्रोक सुरू केला आहे. 

        महायुतीतील घटक पक्षांमध्ये सीट वाटप आणि सन्मानाच्या मुद्द्यावरून तणाव असताना, शिंदे गटाने या गटात स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची तयारी दाखवली आहे. स्थानिक सूत्रांच्या मते, "पक्षीय वर्चस्वासह घराणेशाही आणि धनशक्तीच्या विरोधात शिंदे सेनेचा हा प्रयत्न 'नव्या खेळाडू' च्या उदय सह प्रस्थापितांच्या वर्चस्वावर "नांगर" फिरवू शकतो."

पुसेसावळी गट हा खटाव तालुक्यातील महत्त्वाचा भाग असून, यात पुसेसावळी आणि म्हासुर्णे पंचायत समिती गणांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत या भागात राष्ट्रवादी अ..प. आणि श.प. या दोन्ही गटांसह भाजप आणि इतर प्रस्थापित पक्षांतील घराणेशाही चे वर्चस्व राहिले आहे. मात्र, महायुतीच्या अंतर्गत चर्चेत शिंदे सेनेला 'सन्मानाची वागणूक' न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत साताऱ्याचे मा.पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. सातारा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात आणि मुलाखतीत पुसेसावळीसह खटाव तालुक्यातील गटांवर विशेष भर देण्यात आला. स्थानिक राजकीय निरीक्षक सांगतात की, "शिंदे सेनेने सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत काही ठिकाणी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आता जिल्हा परिषदेत पुसेसावळी गटात उमेदवार उभा केल्यास हा गट "शिंदे सेनेचा पहिला "ब्रेकथ्रू" ठरू शकतो. प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात 'शिंदे सेनेची जनजागृती' आणि 'महायुतीतील असंतोष' याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे."

         "पुसेसावळी गटातील मतदार विकासाच्या मुद्द्यांवर मत देतील. त्यामुळे आता हा मतदार राजा "सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता" हे समिकरण राबवत जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करत वर्षानुवर्षे मुलभूत समस्यांचे घोंगडे भिजत घालून त्यावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही.  पाणीटंचाई, रस्ते, शेतीसाठी यंत्रसामग्री आणि आरोग्य सुविधा यांसारख्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आम्ही लढणार. महायुतीत सन्मान मिळाला नसल्यानेच हि जनतेच्या हितासाठी स्वतंत्र लढाई सुरू झाली आहे." 

      त्यामुळे पुसेसावळी गटातील लढाई आता 'प्रस्थापित धनशक्ती सह घराणेशाही vs शिंदे सेना' अशी झाली आहे. या गटात 'शिवसेना शिंदे खाते खोलण्याची' शक्यता वाढली आहे. मतदार आता प्रश्न विचारत आहेत. पैशाच्या जोरावर चालणाऱ्या प्रस्थापितांना की, नव्या ताकदीच्या शिंदे सेनेला संधी द्यायची? या करीता मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सातारा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांची लाडकी बहिण सौ.काजलताई सुभाष नांगरे पाटिल यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली असल्याने त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठिंब्याने धनुष्यबाण या चिन्हावर ही निवडणूक लढविणार असून पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनी मला आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला