वर्णेच्या काळभैरवनाथ केसरी बैलगाडी आखाड्यात राजधानी एक्सप्रेस बलमा गाडी ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी

 देशमुखनगर  : वर्णे येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या बैलगाडी आखाड्यात गोडोलीच्या अक्षय शिवाजी मोरे यांची राजधानी  एक्सप्रेस बलमा ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तिला एक लाखाचे रोख बक्षीस, या  आखाड्यात द्वितीय क्रमांकाचे मानकरी भैरवनाथ प्रसन्न  गडकर आळी (सातारा ) ही गाडी ठरली असून तिला साठ हजाराचे रोख बक्षीस, तृतीय क्रमांकाचे चाळीस हजाराचे बक्षीस दत्ता शिंदे पाटखळ यांनी मिळवले तर चतुर्थ क्रमांकाचे तीस हजाराचे बक्षीस वर्णे येथील रणजित पवार यांच्या 
बैलगाडीने मिळवले असून, पाचव्या क्रमांकाचे  पंचवीस हजाराचे बक्षीस वर्णे येथील माजी सरपंच विजय पवार यांच्या बैलगाडीने मिळवले असून, सहाव्या क्रमांकाचे  पंधरा हजारांचे बक्षीस पुसेगावच्याआम्रपाली बाळासाहेब शिंदे यांच्या बैलगाडीने मिळवले असून, बक्षीस विजेत्या प्रत्येक गाडीला दोन मानाच्या ढाली मिळाल्या आहेत.
      सदरच्या  आखाड्याचे नियोजन वर्णे
येथील आ. शशिकांत शिंदे 
मित्रसमूहाने केले होते. या आखाड्यात आ. शशिकांत शिंदे मित्र समूह, अमर बळीराम पवार, विकास साहेबराव पवार, सुनिल तुकाराम काकडे, अविनाश विलास पवार, धैर्यशील देवबा पवार,अंगापूरचे ऋषीराज कणसे, गौरव कणसे, प्रफुल्ल कणसे, खेडचे कामेश कांबळे, सातारा येथील टॉप गिअर 
ट्रान्समिशनचे कार्यकारी संचालक श्रीकांत पवार, वर्णे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक राजेंद्र पवार, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर दयानंद चव्हाण, अपशिंगेच्या
प्राची ट्रेडर्सच्या शिवराज रानभरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धनंजय रानभरे यांच्याकडून, वर्णेच्या बाजी ग्रुपकडून रोख बक्षिसांचे
प्रायोजकत्व स्वीकारले होते. मानाचा ढाली श्री काळभैरवनाथ  कॅस्ट्रशन वर्णे  व तळेकर अर्थमूव्हर्स यांच्याकडून मिळाल्या होत्या. या आखाड्याचे थेट प्रक्षेपण सरपंच ऍग्रो वर्णे आणि शिवराज ग्रुप महामुलकरवाडी यांनी केले होते. थेट प्रक्षेपणामुळे गाडीचा क्रमांक ठरवणे एकदम सोपे जात होते.
            हा आखाडा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  आ. शशिकांत शिंदे 
मित्रसमूहाने परिश्रम घेतले तर समालोचक म्हणून  पेडगावचे सुनिल मोरे यांनी काम पाहिले तर झेंडा पंच बापू धनावडे यांनी काम केले. या आखाड्यात १५० बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या आखाड्याला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते, खाद्य  पदार्थांच्या स्टॉलची गर्दी होती. अशा आखाड्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना मिळत असून देशी गोवंश वाचवण्याचे मोलाचे काम होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त