औंध पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी दिले गोवंशाला जिवदान
गोवंश कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या इसमांवर कारवाई करत सुमारे सव्वालाखाचा माल जप्तआशपाक बागवान
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
- बातमी शेयर करा
औंध: औंध पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वडगाव ते चोराडे रस्त्यावर लिंबारे वस्तीजवळ दि. १५/०७/ २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची एक टाटा एस (छोटा हत्ती) क्र. एम.एच.११ एक.जी. ५१४० या वाहनाने पांढऱ्या रंगाचे गोवंश आणि काळ्या रंगाचा रेडा विनापरवाना कत्तली साठी वाहतूक करून नेत असल्याबाबतची फिर्याद औंध पोलीस स्टेशन येथे दादासो मारुती माळी, वय - ४८ वर्षे, व्यवसाय - शेती, रा. वडगांव (ज. स्वामी), ता. खटाव, जि. सातारा, यांनी दिली आहे.
याबाबत औंध पोलीसांनी आरोपी नं. १) अनिल मोहन गायकवाड, वय -३२ वर्षे, रा. तडसर वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली. २)बबन बंडू उमापे, वय -६६ वर्षे, रा. राहाटणी, ता.खटाव, जिल्हा सातारा यांचेवर
गु.र.नं.-२०४/२०२३ महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ अ,५ ब,९ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११, मोटार वाहन कायदा ५०/१७७, ३(१)/१७७,८३(१)/१७७, भा द वि कलम -३४ नुसार कारवाई करत
सी.आर.पी.सी. ४१(१)प्रमाणे नोटीस दिली.
संबंधित गुन्ह्यातील इसमांकडून अंदाजे किंमत २०,०००/- रूपयांची एक गोवंशिय पांढऱ्या रंगाची गाय, जीचे वय अंदाजे ६ वर्षे, ३०० किलो ग्राम वजन अंदाजे, व अंदाजे किंमत २०००/- रूपयांचा एक काळ्या रंगाचा रेडा, त्याचे वय अंदाजे १ वर्षे, १०० किलो ग्राम वजन अंदाजे आणि अंदाजे किंमत १,००,०००/- रूपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची बॉडी असलेली मालवाहतूक करणाऱ्या टाटा एस (छोटा हत्ती) वाहन क्रमांक एम.एच.११ ए. जी.५१४० जुना वाहण कींमत अंदाजे असा एकूण किंमत १,२२,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल सरतापे करत आहेत.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 18th Jul 2023 02:48 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 18th Jul 2023 02:48 pm













