ऊसतोड कामगाराकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी उद्या कोरेगाव तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन : अंकुश पाचांगणे

  पुसेगाव: ऊसतोड कामगाराकडून, ॲडव्हान्स मध्ये पैसे देऊनही ज्या शेतकऱ्यांची ऊसतोड कामगाराकडून फसवणूक झाली असेल,अशा शेतकऱ्यांनी उद्या दिनांक 7 रोजी कोरेगाव तहसील कार्यालय येथे जमा होऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी तसेच बेंबळे तालुका माढा  जिल्हा सोलापूर येथील शेतकरी भोसले यांची उत्तर प्रदेशामध्ये अमानुष हत्या केल्याच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहण्याचे
आवाहन माथाडी कामगार व गुमास्ता युनियन संस्थापक अध्यक्ष माननीय अंकुशराव पासांगणे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
.  अनेक शेतकऱ्यांनी कारखान्या व्यतिरिक्त आपले पैसे ऊसतोड कामगार टोळ्यांना देऊन अनेक शेतकऱ्यांनी स्वतंत्र टोळ्या आणल्या. परंतु त्या टोळ्या थोड्याफार प्रमाणात काम करून पशार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेले उचल  लाखो रुपये उचलून या टोळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस आणत आहेत. यांच्यावर खाजगी टोळ्या असल्या तरी  कारखान्याचे निर्बंध लावणे गरजेचे आहे. तर या टोळ्या शेतकऱ्याची फसवणूक करू शकणार नाहीत. खाजगी शेतकरी आपल्या लाखो रुपयाची उचल या टोळ्यांना देऊन, ऊसतोड करण्यासाठी आणत असताना ऊसतोड करून ऊस कारखान्यांना उचलण्यासाठी या शेतकऱ्याकडून कारखानदारांना मोठी मदतच होत आहे. परंतु या खाजगी टोळ्या मात्र थोड्या प्रमाणात काम करून शेतकऱ्यांना चांगलेच आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणत आहेत  व पळून जात आहेत. शिवाय सदर ज्या ठिकाणावरून आणले त्या ठिकाणी गेल्यास दमदाटी करून, तसेच शिवीगाळ करून, वेळ पडल्यास मारण्यासही कमी पडत नाही, अशा टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे या टोळ्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी उद्या दिनांक सात रोजी कोरेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माथाडी व गुमास्था कामगार युनियन अध्यक्ष अंकुशराव पाचांगणे यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त