राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा उत्साहात साजरा

सातारा : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिन  उत्साहाच्या वातावरणात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले आहे.यावेळी 
जलतरण फुटबॉल खोखो क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी ऍडव्होकेट प्रियंका घोरपडे यांच्या शूभहस्ते तसेच समारंभाचे अध्यक्ष नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा, ऍड सुरेश रुपनवर, मेजर वीरकर राष्ट्रीय खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले 
सदर उद्‍घाटन समारंभाचे प्रास्ताविक नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांनी केले. त्यांनी खेळाडूंना मेजर ध्यानचंद याचे जीवन परिचय करून दिला तसेच खेळाचे महत्व सांगितले, तसेच प्रत्येक आंतर राष्ट्रीय खेळाडूंची सुरवात ही शालेय स्पर्धेतून होते, राज्य व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्रापत खेळाडुंना शासकीय सेवे मध्ये ५% आरक्षणाचा लाभ मिळतो असे सांगितले, जिल्ह्यातील सर्व खेळाडूना राष्ट्रीय क्रीडा दिन शुभेच्या दिल्या.
या नंतर प्रमुख पाहूणे  राजेंद्र सावंत्रे यांनी आपला खेळाचा अनुभव खेळाडुं सांगताना त्यांच्या खेळाची सुरुवात अशाच शालेय स्पर्धे पासुन झाली होती, सदर स्पर्धेचे महत्व त्यांनी सांगीतले, स्पर्धेतील हार जीत हा खेळाचा भाग आहे व खेळाडूवृतीने सदर स्पर्धेत खेळावे असे बोलुन सर्व खेळाडूंना शुभेच्या दिल्या.विजयी खेळाडूना मेडल्स व प्रमाणपत्र देण्यात आली 
 सदर समारंभाचे सूत्रसंचलन  नीलम पवार यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त