यशराज इथेनॉल कंपनीवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : अन्यथा रयत क्रांती संघटना गनिमी काव्याने आंदोलन करणार

सातारा : जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने तसेच उद्योग राजरोस प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करीत असताना त्याबाबत हजारो तक्रारी अर्ज दाखल झाले. तरी देखील त्यावर कोणतीच कारवाई न करणाऱ्या प्रदूषण महामंडळाचा मस्तवाल अधिकारी भड आणि यशराज इथेनॉल कंपनीवर कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे. तसेच येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा देखील साबळे यांनी दिला आहे.

सातारा तालुक्यातील यशराज इथेनॉल कंपनी राजरोस प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करत आहे. त्यावर रयत क्रांती संघटनेने अनेकदा निवेदन प्रदूषण महामंडळ सातारा कार्यालयाला दिले. त्यावर भड यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट कंपनीचे काम उत्तम सुरू असल्याचा अप्रत्यक्ष दाखला भड कोणत्या हेतूने देत आहेत ? तसेच कंपनीवर कारवाई करण्याचे सोडून उलट शेतकऱ्यांना धमकवण्याचे भड करत आहेत. त्यामुळे आता कंपनी आणि भड यांच्या कारभाराची सखोल चौकशी आता जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी केली पाहिजे. अन्यथा येत्या दिवसात रयत क्रांती संघटना कोणताही इशारा न देता भड नामक अधिकारी व कंपनीच्या विरोधात लोकशाही मार्गाने परंतु गनिमी काव्याने आंदोलन करणार असल्याचे साबळे यांनी सांगितले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला