उत्कृष्ट संस्था चालक-पालक म्हणून तुषार पाटील यांचा यथोचित सन्मान..

Due honor to Tushar Patil as an excellent organization driver-guardian..

सातारा : सातारा शहराजवळील करंजे पेठ येथे शिक्षण प्रसारक संस्था श्रीपतराव पाटील हायस्कूल आदर्श विद्या मंदिर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि माणिक कासं बालक मंदिर या ज्ञानमंदिर चालवीत असते याच संस्थेचे कल्पक व कार्यक्षम सचिव आदरणीय तुषार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शन आले या सर्व शाखा नाभारपाला आलेले आहेतआदरणीय सचिव तुषार पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात अहो पूर्व काम करताना फक्त आपले काम संस्था पुरते मर्यादित न राहता संस्थेच्या सर्व शाखेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या कुटुंबाप्रमाणे वागणूक देत त्यांच्या अडीअडचणीत खंबीर असा पाठिंबा दिलेला आहे मध्ये कोरोना काळात सर्व कुटुंबे भयभीत झाले असता त्यांनी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये बालसक्षमीकरण अभियान राबविले आणि विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही आरोग्याची काळजी घेतली.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मा.श्री.तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तिन्ही दिवशी अखंड भारतासाठी सैन्यात सेवा केलेल्या सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते झेंडावंदन करुन शासनाच्या "घरघर तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात  सिंहाचा वाटा उचलला.दिनांक १३ ऑगेस्ट रोजी करंजेस्थित विद्यालयाचे माजी विद्यार्थी यशपाल बनसोडे यांच्या हस्ते होळीचा टेक अर्थात झेंडा चौक येथे तर कोंडवे ता.सातारा येथील श्री.गायकवाड यांच्या हस्ते श्रीपतराव पाटील येथील झेंडावंदन तर १४ऑगस्ट रोजी झेंडा चौक येथील करंजेस्थित व सद्या म्हसवे ता.साताराचे रहिवाशी नामदेवराव किर्दत तर श्रीपतराव पाटील हायस्कूल येथील ठोंबरेवाडी ता सातारा येथील श्री.विठ्ठलराव भोसले यांच्या हस्ते ध्वजावंदन संपन्न झाले.. १५ऑगस्ट रोजी झेंडाचौक येथील ध्वजारोहण नवीमुंबई येथील माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव-भुजबळ यांच्या हस्ते तर श्रीपतराव पाटील हायस्कूल येथील ध्वजारोहण विद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु.साक्षी कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तदनंतर विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री.आर.एस. जाधव यांच्या पुढाकराने इयत्ता ९ वी व १० वी च्या सर्व तूकडयामधील गुणवंताचे तसेच विविध क्षेत्रात काम करणा-या यशवंतांचा  यथोचित सन्मान करण्यात आले.विद्यालयाचे श्री.आर.एस. जाधव यांच्या वतीने उत्कृष्ट संस्था चालक-पालक म्हणून संस्थेचे कार्यक्षम सचिव तुषार पाटील यांना गौरविण्यात आले तर संस्थेचा आर्चरी खेळाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू चिरंजीव पार्थ साळुंखे यांच्या अदितीय कामगिरीबद्दल त्याचे प्रशिक्षक व विद्यालयाचे उपशिक्षक श्री सुशांत साळुंखे आणि ग्रंथपाल सौ अंजली साळुंखे यांचाही यथोशीत गौरव करण्यात आला त्याचवेळी कन्याशाळा सातारा येथे झालेल्या डॉक्टर एस आर रंगनाथन जयंती निमित्त कथाकथन व पुस्तक परीक्षण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला. दिनांक १३,१४ व १५  रोजीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियोजन संस्था सचिव तुषार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात मा.मुख्याध्यापक रविंद्र फड़तरे पर्यवेक्षक अमर वसावे आणि क्रीडाशिक्षक यशवंत गायकवाड  यांनी केले तर सर्व दिवसांच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री यशवंत गायकवाड यांनी केले आणि संस्था-चालक,शिक्षक आणि विद्यार्थी या सर्व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक रवींद्र निकम यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त