साहेब, जिल्ह्याचे मालक नको तर पालक व्हा..

पालकमंत्र्यांच्या स्वागताला डेसिबलचे तीनतेरा; सातारकरांमधून स्पष्ट नाराजी

सातारा : जिल्ह्याच्या पदरी एक उपमुख्यमंत्री व चार मंत्री पदे मिळाल्यानंतर सातारा जिल्हा आनंदून गेला आहे. शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे अशी मातब्बर मंडळींची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर पालकमंत्री पदाची जबाबदारी कोण सांभाळणार, अशी चर्चा सातारकर करत होते. पालकमंत्री पदाच्या घोषणा होण्यापूर्वी सातारचे पालक कोण होणार ? याची उत्सुकता लागली होती. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक चार आमदार असताना पालकमंत्री म्हणून पुन्हा शंभूराज देसाई यांना जबाबदारी देण्यात आली. मात्र, शंभूराज देसाईंचे पालकमंत्री पदी नाव जाहीर होताच सातारकरांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले.

 या सर्व नाराजीनाट्यानंतर नूतन पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे काल साताऱ्यात जोरदार स्वागत झाले. मात्र पालकमंत्र्यांच्या स्वागताला आतुरलेली जिल्ह्यातील युवासेना भलतीच उत्साही होती. दरम्यान गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवात डॉल्बीला डेसिबलची क्षमता ठरवून दिली जात असताना पालकमंत्र्यांच्या स्वागताला मात्र हे डेसिबलचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. या डॉल्बीचा आवाज एवढा मोठा होता कि चक्क शंभूराज देसाई यांनीच कानावर हात ठेवले होते. या कानठिळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे जल्लोषी वातावरणात सुद्धा सातारकरांची नाराजी स्पष्ट जाणवत होती. यावेळी पोलीस यंत्रणेने हि बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

 एकीकडे मागील अडीच वर्ष सायरनच्या आवाजाने त्रस्त झालेल्या जनतेच्या कानाच्या पुन्हा डॉल्बीच्या आवाजाने चिंधड्या उडवत हाच त्रास पुन्हा सहन करावा लागण्याचा जणू इशाराचा मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारकरांना दिला नाही ना ? असा प्रश्न पडत असताना शंभूराज देसाई यांनी जिल्ह्याचे मालक न होता पालक होऊन जबाबदारीने पद सांभाळावे, अशी मागणी आता सातारकर करू लागलेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त