स्वातीचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून मलकापूरात माणुसकीला काळींबा फासणारी घटणा
प्रकाश शिंदे- Sat 12th Nov 2022 10:39 am
- बातमी शेयर करा
शिराळा : बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून स्वाती प्रकाश शेवाळे (वय- 26, मूळ गाव- बेलदारवाडी, सध्या रा. मलकापूर- कराड) यांचा संशयित आरोपी पती प्रकाश आनंदा शेवाळे याने गळा दाबून खून केला. सदर घटना दि. 10 रात्री 10 ते दि 11 च्या सकाळी 11 वाजण्याच्या दरम्या राहत्या घरी झोपलेल्या ठिकाणी गळा दाबून खून करण्यात आला. संशयित आरोपी प्रकाश शेवाळे हा घटनास्थळावरून पसार झाला आहे
याबाबतची फिर्याद मयत स्वाती हिची आई वत्सला हणमंत चव्हाण (वय- 48, रा.मलकापूर कराड, मुळगाव- गुंजेवाडी, जि. उस्मानाबाद) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. मयत स्वाती व प्रकाश शेवाळे यांना मुलगा अथर्व (वय- 4) व मुलगी आराध्या (वय- 2) अशी दोन लहान मुले आहेत. आई वडीलांच्या भांडणात दोन चिमुकली भावंडे पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी प्रकाश शेवाळे हा पत्नी स्वाती सह मुलांना घेऊन कराड येथे मोलमजुरी करून भाड्याने रहात होता. प्रकाश आपली पत्नी स्वाती हिच्यावर वारंवार चारित्र्याचा संशय घेत होता. तर गुरुवार दि. 10 रोजी प्रकाश याची आई रंजना या वडील आनंदा यांना घेऊन कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. तिथे प्रकाश व पत्नी स्वाती हे दोघे ही गेले. तेथून प्रकाश पत्नी सह बेलदारवाडी येथे गावी सायंकाळी आला. सर्वांनी एकत्र जेवण केले. आनंदा हे आजारी असल्याने रंजना या त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या व सकाळी लवकर उठून जनावरांना वैरण व शेण घान करण्यासाठी शेतात गेल्या. सकाळी नऊ वाजता घरी परत आल्या तर मुलगा व सून यांच्या खोलीचं दार बंद दिसलं. यावेळी त्यांनी आवाज दिला तर प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून दरवाजा उघडला तर सून स्वाती ही निपचीत पडलेली दिसली. तर मुलगाही तिथे नव्हता.
यावेळी मयत स्वाती हिच्या मृतदेहा शेजारी चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत लिहिले आहे की, मी माझी पत्नी स्वाती हिचा गळा आवळून खून केला असुन यात माझ्या घरच्याना किंवा स्वाती हिच्या घरच्याना कोणालाही दोषी धरु नये. राहत्या घरी झोपलेल्या ठिकाणी गळा दाबून पती प्रकाश याने खून केला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, पोलीस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर, कालिदास गावडे, गणेश झनजरे, दीपक हांडे, विनोद जाधव, भाऊसाहेब कुंभार, सुभाष पाटील, अमर जाधव, अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी प्रकाश शेवाळे याचा शोध घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार हे करीत आहेत.


स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 12th Nov 2022 10:39 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 12th Nov 2022 10:39 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 12th Nov 2022 10:39 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 12th Nov 2022 10:39 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 12th Nov 2022 10:39 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 12th Nov 2022 10:39 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 12th Nov 2022 10:39 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 12th Nov 2022 10:39 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 12th Nov 2022 10:39 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 12th Nov 2022 10:39 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 12th Nov 2022 10:39 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 12th Nov 2022 10:39 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 12th Nov 2022 10:39 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 12th Nov 2022 10:39 am













