दोन्ही आघाडीचे नेते साताऱ्याच्या विकासावर बोलतात.मात्र,इतर पक्ष मूग गिळुन बसतात !
Satara News Team
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शहराला ऐतीहासीक वारसा असताना नगरपालीकेची अनेक पंचवार्षिक निवडणुकामध्ये सत्ता ही एकतर नवीआ किंवा सावीआ या आघाडीच्या नेत्यांच्याकडेच आलटून पालटून असते. तेच बोलतात.मात्र,इतर पक्ष मुग गिळून बसतात.
निवडणुका आल्या की, एकमेकावर बेसूमार आरोप - प्रत्यारोप करत असतात. त्यांना जाणकार मतदार तर सोडाच. पण,स्वत:ला राष्ट्रीय पक्षाचे नेते म्हणून मिरवणारे सुद्धा एकही प्रश्न या दोन्ही आघाडीच्या नेत्यांना विचारत नाहीत. ते गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आसल्याचे मत रिपब्लीकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले आहे.
नविआचे नेते हे निवडणूका आल्यानंतर विकास खुटल्याचे व पैसे लुटल्याचे आरोप करतात.पण पाच वर्षे नगरपालीका सभागृहात मात्र टोकाचा विरोध करताना दिसून येत नाहीत.साविआचे नेते हे विकासासाठी इतके कोटी आणले, आम्ही हे केले ते केले.असे वारंवार सांगत असतात.आजही सातारा प्राथमिक सुविधापासून वंचीत कसा राहिला आहे ? एकही रस्ता चांगला नाही. एकही शाळा व आरोग्य सुविधा नगरपालीका देऊ शकली नाही. पैसे आणले तर विकास कोणाचा ? व कसा झाला ? याचा लेखाजोखा तरी मांडून विकासाचे अँडीट करावे.शिवाय,भाजपेत्तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन पालिकेच्या निवडणुकांसाठी सामोरे गेले पाहिजे. अशीही मागाणी चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 2nd Mar 2023 05:56 pm













