साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून डॉक्टर महिलेच अपहरण करून विनयभंग

सातारा : एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अनुप नंदकुमार गाडे (वय ३८, रा. हॅपी होम सोसायटी, एमआयडीसी, सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला डाॅक्टर या ३२ वर्षांच्या असून, त्या साताऱ्यातील एका हाॅस्पिटलमध्ये काम करतात. संशयित अनुप गाडे याने एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरला वारंवार फोन केला. तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांना जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्याने शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. ‘फोनवर बोलली नाहीस. माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या घरातील लोकांना जीवंत सोडणार नाही. घर पेटवून देईन,’ अशी धमकी दिली. हा प्रकार १२ डिसेंबर २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत साताऱ्यातील एका हाॅस्पिटलसमोर घडला आहे. दरम्यान, पीडित महिला डाॅक्टरने बुधवार, दि. २१ रोजी सायंकाळी पावणेचार वाजता सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित अनुप गाडे याच्यावर अपहरणसह विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त