गंभीर आजार आणि अपंग शिक्षक बँकेत उमेदवारी करणार ?
कर्णबधिर आणि गंभीर आजारी लोक बँकेच्या हिताला बाधिकार ठरू शकतात
एकनाथ वाघमोडे- Sun 30th Oct 2022 10:03 am
- बातमी शेयर करा
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा. या कर्मचाऱ्यांच्या बँकेची नुकतीच निवडणूक जाहीर झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची प्रतीक्षा संपल्यानंतर अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनतेमधून अशी चर्चा सुरू आहे की काही शिक्षक गंभीर आजाराने त्रस्त आहेत. आणि अपंग कोट्यातून नोकरीला लागलेले आहेत अशांनी देखील उमेदवारी अर्ज भरल्याचे समजते.
परंतु असा नियम नाही की गंभीर आजाराने त्रस्त आणि अपंग लोकांनी निवडणूक लढवू नये. निवडणूक लढविण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु आजारी आणि गंभीर लोकांना जर निवडून दिले तर ज्या शिक्षकांनी निवडून दिले त्या शिक्षकांचे प्रश्न मांडणार की आजारपणासाठी दवाखान्यामध्ये दाखल होणार.
अशा गंभीर आजारी असणाऱ्या लोकांनी निवडणूक लढवून जर जिंकली तर बँकेच्या हिताचे निर्णय कोण घेणार? बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार? शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कोण झगडणार? असे अनेक प्रश्न तयार होऊन बँकेच्या प्रगतीला आळा बसू शकतो.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक नामवंत बँक म्हणून ओळखले जाते. आत्तापर्यंत या बँकेमध्ये निवडून गेलेल्या सभासदांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे इथून पुढेही अशाच चांगल्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून द्या. कर्णबधिर व गंभीर आजारी लोकांना निवडून दिले तर बँकेचे प्रश्न ऐकणार कोण असा सवाल कर्मचाऱ्यांसह नागरिकांमधून उपस्थित होत आहे..
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 30th Oct 2022 10:03 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 10:03 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 30th Oct 2022 10:03 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 30th Oct 2022 10:03 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 30th Oct 2022 10:03 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 30th Oct 2022 10:03 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 10:03 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 10:03 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 10:03 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 10:03 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 10:03 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 10:03 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 10:03 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 10:03 am













