महाबळेश्वर तालुक्यात अवकाळी या गावातील वनविभागाच्या हद्दीत अनधिकृत डांबरी रस्ता प्रशासन मूग गिळुन गप्प ?

महाबळेश्वर :  महाबळेश्वर तालुक्यात अवकाळी या गावातील वनविभागाच्या हद्दीत पुणे येथील विजय मंत्री या बांधकाम व्यावसायिकाने वन हद्दीचा दगड उचकटून तो दुसरीकडे रोवत वन हद्दी बाबतची दिशाभूल करून वनविभागाच्या क्षेत्रातून रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले असून डांबरीकरणासाठीचे साहित्यही त्यांनी त्या ठिकाणी आणून ठेवले आहे. हा रस्ता करण्यासाठी या परिसरात संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोडही केली आहे.

या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी त्यांनी घेतल्याचे दिसून येत नाही. याशिवाय या परिसरातून वाहणारा पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत संबंधित व्यक्तींनी मुजवला असून सिमेंट पाईप द्वारे हा प्रवाह बंदिस्त करण्याचे काम विनापरवाना सुरू आहे. वन हद्दीतून दहा फूट जमीन खोदून हा  रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. या प्रकारासाठी या प्रक्षेत्राची जबाबदारी असणारे वनपाल श्री. काकडे व वनरक्षक श्री. केळघने हे नियुक्त शासकीय कर्तव्य विसरून आर्थिक देवघेवीतून विजय मंत्री या बांधकाम व्यावसायिकास सहकार्य करीत आहेत.

या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व हा रस्ता बनवण्यासाठी तसेच नैसर्गिक जलस्त्रोत बुजवण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे व वाहने ताब्यात घ्यावीत तसेच त्यांना आर्थिक दंड करून गुन्हे दाखल करण्यात यावी अशी लेखी मागणी शिवसेना उबाटा गटाचे शहर उपाअध्यक्ष गणेश अहिवळे यांनी दिली आहे.  याबाबत वनविभाग व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आठवड्यात कारवाई न केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत प्रशासन व वनविभागाची उदासीनताच कारणीभूत असेल. संबंधित व्यवसायिक व वन विभागाचे दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठोस कारवाई करा आसा इशारा सुद्धा शिवसेना { उ.बा.टा ) गटाचे शहर उपाअध्यक्ष गणेश अहिवळे यांनी दिला आहें 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला