सैदापूरच्या बिल्डरची ५० लाखांची फसवणूक
Satara News Team
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील राधिका रोड येथे एम. के. फायनान्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात सैदापूर (ता. कराड) येथील बिल्डरची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून त्याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नरेंद्र चंद्रकांत जाधव, सोनाली नरेंद्र जाधव (दोघे रा. गडकर आळी), महेश रामचंद्र यादव (रा. विद्यानगर सैदापुर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर येथील बांधकाम व्यावसायिक तथा बिल्डर किरण अधिकराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना इथेनॉलची कंपनी काढायची होती. त्याकरता ते फायनान्सकडून कर्ज मिळते काय याचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना साताऱ्यातील एम. के. फायनान्स या कार्यालयात कर्ज मिळेल असे सांगण्यात आले. त्यावरुन त्यांनी जून २०२१ मध्ये राधिका रोडवर असलेल्या या कार्यालयात संपर्क साधला. या कार्यालयातील नरेंद्र जाधव, सोनाली जाधव यांनी व त्यांच्यासोबतच महेश यादव यांनी कंपनी काढण्यासाठी वेगवेगळ्या स्वरुपात पैशांची मागणी केली.
त्या त्या वेळी तब्बल ५० लाख रुपये त्यांना दिले.
५० लाख रुपये घेवून ही त्यांनी कर्ज दिले नाही. त्यावरुन तिघांच्यावर शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अद्याप अटक करण्यात आली नाही.उपनिरिक्षक मुल्ला हे तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Thu 3rd Aug 2023 05:10 pm













