शिवथरला झाली लाल परी चालू
काही दिवसापूर्वी वाई शिवथर एसटी बस बंद करण्यात आली होती ती आता पूर्ववत चालू झाली
सुनिल साबळे- Mon 27th May 2024 11:33 am
- बातमी शेयर करा
शिवथर : वाई आगाराची एसटी बस गेली 32 वर्ष शिवथरला मुक्कामी येत होती तसेच शिवथर ते वाई दिवसातून तीन फेऱ्या मारणारी लाल परी वाई डेपो मॅनेजर यांच्या मनमानी कारभारामुळे कोणतीही पूर्व सूचना प्रवाशांना न देता बंद केल्याने प्रवाशांनी सातारा न्यूज ला तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्यामुळे सातारा न्यूज ने याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती याची दखल घेऊन वाई डेपो मॅनेजर स्वाती बांद्रे यांनी पुन्हा शिवथरला लालपरी चालू केली त्याबद्दल त्यांचे युवक वर्ग तसेच प्रवासी यांनी अभिनंदन केले
शिवथर परिसरातील शेकडो प्रवासी वाईला नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी जात येत असतात परंतु काही दिवसापूर्वी वाई शिवथर बस बंद करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांचे अतिशय हाल होत होते सदरची वाई ला जाणारी बस ही न्हाळेवाडी मालगाव राऊतवाडी किसनवीर सहकारी साखर कारखाना पाचवड भुईंज या मार्गे वाईला जात असते हा रस्ता सोयीस्कर असल्याने प्रवाशांना सोपे जाते परंतु एसटी बस बंद झाली तर याच प्रवाशांना सातारा मार्गे जाणे अवघड तसेच खर्चाचे असल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता परंतु सातारा न्यूजने प्रवाशांची दखल घेऊन याबाबत वाई डेपो मॅनेजर तसेच सातारचे डीसी यांच्याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती याची दखल घेऊन पुन्हा नव्याने मुक्कामी असणारी शिवथरला वाई डेपोची बस चालू केल्याने समाधान व्यक्त केले आहे तसेच सर्व प्रवासी तसेच ग्रामस्थांनी सातारा न्यूजचे आभार मानले आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 27th May 2024 11:33 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 27th May 2024 11:33 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 27th May 2024 11:33 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 27th May 2024 11:33 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 27th May 2024 11:33 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 27th May 2024 11:33 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 27th May 2024 11:33 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 27th May 2024 11:33 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 27th May 2024 11:33 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 27th May 2024 11:33 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 27th May 2024 11:33 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 27th May 2024 11:33 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 27th May 2024 11:33 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 27th May 2024 11:33 am











