२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

सातारा : मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी, पोलीस जवान, भारतीय सैन्य दलातील जवान तसेच निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 हे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्यातील एकूण दहा ठिकाणी पार पडणार आहे. यामध्ये पोलीस मुख्यालय, सातारा; उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वाई; कराड तालुका पोलीस ठाणे; फलटण शहर पोलीस ठाणे; दहिवडी पोलीस ठाणे; वाठार पोलीस ठाणे; शिरवळ पोलीस ठाणे; म्हसवड पोलीस ठाणे; पुसेगाव पोलीस ठाणे आणि पाटण पोलीस ठाणे या ठिकाणांचा समावेश आहे.

 २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांसह देशासाठी लढणाऱ्या शूर पोलीस अधिकारी आणि जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या अतुलनीय शौर्याची आणि त्यागाची स्मृती कायम जिवंत ठेवण्यासोबतच त्यांच्या स्मृतींना विधायक सामाजिक कार्यातून अभिवादन करण्याच्या उद्देशाने या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 सातारा जिल्हा पोलीस दल, जिल्हा रुग्णालय सातारा, जिल्ह्यातील विविध रक्तपेढ्या आणि ब्लड बँका यांच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत आहे.

 या महा रक्तदान शिबिरात सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार, होमगार्ड, पोलीस पाटील संघटना, पोलीस मित्र यांच्यासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदानाच्या सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.

  शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रक्तदानातून माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

 पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला