मिसेस पाचगणी 2024 चा सौ. मेघा गावडे यांना मुकुट, तर मिस पाचगणी ठरली कुमारी चहल ओसवाल

पांचगणी : पांचगणी (तालुका महाबळेश्वर) येथील रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या मिस अँड मिसेस पांचगणी 2024 या स्पर्धेचा मिसेस पांचगणी मुकुट सौ. मेघा गावडे यांनी पटकावला तर मिस पांचगणी किताब कुमारी चहल ओसवाल हिने पटकावला.

पांचगणी येथील सेंट पीटर्स स्कूलच्या सभागृहात पार पडलेली हि स्पर्धा प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साह व जल्लोषात पार पडली. स्पर्धेचे आयोजन रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या संचालिका सौ. प्रियांका भंडारी यांनी केले होते. या स्पर्धेत मिसेस पाचगणी 2024 ची मानकरी ठरली सौ. मेघा गावडे तर मिस पाचगणी 2024 हा किताब पटकावला कुमारी चहल ओस्वाल हिने.
मिसेस पांचगणी या गटातून द्वितीय क्रमांक सौ. नीलम ओसवाल व तृतीय किताब सौ. साधना भिकुले या मानकरी ठरल्या. तसेच मिस पाचगणी या गटातून द्वितीय कुमारी कोमल घाडगे तर आर्या जाधव यांनी तृतीय किताब पटकावला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हील रेंजच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांचे अध्यक्षतेखाली व स्वप्ना केळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी , माजी अध्यक्ष शिवाजी शिंदे, राजेंद्र पार्टे , भारतभाई पुरोहित, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कारंजकर, संतोष चिकणे, विनोदकुमार कनवा, श्रद्धा शाह, मुस्तफा हुसेन माला, श्रुती बगाडे, रफिक सय्यद, नितीन मर्ढेकर, चांगदेव जाधव आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून गणेश फरांदे, मयुरी जाधव, शुभांगी बावळेकर यांनी काम पाहिले.

यावेळी बोलताना तेजस्विनी भिलारे म्हणाल्या रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंटने पांचगणीत पहिल्यांदाच मिस अँड मिसेस पांचगणी 2024 स्पर्धा उत्कृष्टरित्या आयोजित करून अक्षरशः
बॉलिवूडचा भास दिला. झाला. पाचगणी सारख्या शहरातअशा स्वरूपाच्या भव्य स्पर्धा होत आहे हे पाहून खरोखरच आश्चर्य वाटले. अशा स्पर्धा पांचगणीत व्हाव्यात अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धेतून महिलांना उत्साह आणि त्यांच्या टॅलेंटला वाव व प्रोत्साहन मिळणार असल्याचे स्वप्ना केळकर यांनी सांगितले.
सौ.प्रियांका भंडारी यांनी सर्वांचे स्वागत केले तर जितेंद्र भंडारी यांनी आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला