पावसाळ्यात भुईंज ओझर्डेकरांची वाट खडतर , जीवघेणे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था

सातारा : 
 वाई तालुक्यातील भुईंज व ओझर्डे या दोन मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या काही वर्षापासून मोठी दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावर मधोमध अनेक ठिकाणी जिवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, वाहन चालवताना वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागते.  
  ठिकाणच्या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडले असल्याने रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे प्रवासी वर्गाला अवघड झाले आहे
  या रस्त्यावर वाई तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावांतील शेतकरी, सामान्य जनतेसह नोकरदार वर्ग ये जा करीत असतात 
 या भागाची लोकसंख्या देखील जास्त आहे. या मार्गावरुन एसटी महामंडळाच्या बसेस जात नाहीत. 
   त्यामुळे येथील नागरिकांना वाहतुकीसाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा
लागतो. कामानिमित्ताने व्यवसायासाठी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर मधल्या मार्गाने  जात असतात. विशेषतः
या ठिकाणच्या विद्याथ्यांना शिक्षणासाठी भुईंज,वाई या ठिकाणी जावे लागते. 
   परंतु आता खराब रस्त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था येथील विद्यार्थी, वृद्ध, आजारी व्यक्ती यांची झाले असू येथून पुढचा प्रवास हा येणाऱ्या पावसात
अतिशय खडतर बनणार हे मात्र निश्चित आहे
 त्यामुळे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे अशी मागणी राजेंद्र गायकवाड दिलिपराव भोसले, उत्तम भोसले यांच्यासह भुईंज ओझर्डेकर ग्रामस्थ करीत आहेत.
दरम्यान भुईंज परीसरातील अनेक विकासकामाबाबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमीच अग्रेसर असतात. अनेक विकासकामांचे भूमिपूजन मोठे नेते, लोकनेते यांच्याहस्ते केले जाते.सकाळी एका पार्टीने भुमिपूजन केले तर सायंकाळी तेथे दुसऱ्या पार्टीचा नारळ हा फुटतोच मग आम्ही त्यांच्या कामाचे श्रेय घेत नाही तर तेच आमच्या कामाचे श्रेय घेत आहेत.अशी भूमिका दोन्ही पक्षातून व्यक्त होत आहे,
   मात्र, विकास कामांचे नुसतेच नारळ फोड्या गॅंग भुईंजमध्ये तयार झाली आहे.त्याची झळ मात्र सामान्य जनतेसह अबाल वृध्दांना बसत आहे.

"काम करायचे तेव्हा करा पण तूर्तास रस्त्यावर मुरूम किंवा मोठी खडी तरी पसरा राजकीय श्रीवादात सापडलेल्या या रस्त्यावर पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी किमान भुईंज ग्रामपंचायत ने फुले नगर भोसले वस्ती या ठिकाणी मुरूम किंवा मोठी खडी पसरवी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे"


"अन्यथा जबाबदारी स्वीकारा लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा होणाऱ्या दुर्घटना ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी जेष्ठ नागरिक संघाचे नेते जगन्नाथ दगडे पांडुरंग शेवते यांनी केली आहे"

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त