घर दुरुस्तीसाठी आलेल्या कामगारांनेच १ लाख ५३ रुपयांची केली चोरी ; मलवडी मधील घटना

मुद्देमाल केला हस्तगत ; आरोपीस दहिवडी पोलिसांनी केले जेरबंद.

आंधळी, ता :२४ मलवडी ता. माण येथील दशरथ रामू बोराटे यांच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या कामगारांनीच घरातील १ लाख ५३ हजार रुपयाची चोरी केली असून याबाबत दहिवडी पोलिसांनी पोलिसांनी आरोपी दादासाहेब रामचंद्र जगदाळे यास ताब्यात घेत चौकशी केली असता गुन्हा केल्याचे उघडकीस आले.


 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दशरथ रामू बोराटे रा. मलवडी ता. माण हे कामावर गेले होते त्यावेळी त्यांचे पत्नी व आई घरी असताना घर दुरुस्तीचे काम चालू असल्याने त्यांनी त्यांनी कामाकरिता ओळखीचे दादासाहेब रामचंद्र जगदाळे, उत्तम युवराज जगदाळे व पप्पू बिहारी या तिघांना घर दुरुस्तीच्या कामाकरता त्यांच्या घरी पाठवले दरम्यान त्यांचे खडीमशनी वरती कामगारांचे पैसे देण्याकरता घरी ठेवलेले पैसे आणण्यासाठी घरी आले परंतु पैसे मिळून न आल्याने त्यांनी त्यांचे पत्नीस विचारणा केली असता ते शेतामध्ये असल्याचे कळाले त्यानंतर ज्या रूममध्ये पैसे ठेवले होते त्या रूमचा दरवाजा उघडा होता. यावेळी त्यांनी रूम मध्ये जाऊन बेडमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रुपये व त्यांची पत्नी हिच्या पर्समध्ये ३६०० रुपये असे एकूण १ लाख ५३ हजार ६०० रुपये चोरीस गेली असल्याची लक्षात आल्यानंतर त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची खबर देऊन गुन्हा नोंद केला.


 सदर गुन्हातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रेय दराडे व सहकारी यांनी पुण्यातील आरोपीचा शोध घेऊन गोपनीय बातमी मार्फत माहिती काढत घर दुरुस्ती साठी कामावर असलेले कामगाराकडे चौकशी केली असता इसम दादासाहेब रामचंद्र जगदाळे रा. शिरवली ता. माण यास ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यास अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम १लाख ५३ हजार ६०० रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आली. 

 पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे,उपनिरीक्षक यशवंत जामदार, गुलाब दोलताडे, प्रकाश हंगे पो.हवा.नितीन धुमाळ, आजिनाथ नरबट, महेंद्र खाडे, निलेश कुदळे यांनी कारवाई केली.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला