सह्याद्रि कृषि व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा
Satara News Team
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
- बातमी शेयर करा
कराड: यशवंतनगर (कराड ) सह्याद्री सहकारी कारखाना संचालित व महात्मा फुले कृषि संलग्न नवीन सह्याद्री कृषि महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून मान्यता मिळालेली आहे. महाविद्यालयामध्ये कृषि व कृषि अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री आबासाहेब पाटील आणि शेती अधिकारी श्री व्ही. बी. चव्हाण हे उपस्थित होते. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अभ्यासक्रम व इतर उपक्रम याबद्दल माहिती दिली.
विदयार्थ्यांनी शैक्षणिक, कला, कौशल्य, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग घेऊन स्वतःचा आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा तसेच कृषि शिक्षणाचा वापर शेतकरी व शेती पूरक व्यवसायासाठी करावा. त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व महाविद्यालायचे संस्थापक-अध्यक्ष आमदार श्री बाळासाहेब पाटीलसाहेब तसेच महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष श्री जशराज पाटील (बाबा) आणि सर्व संचालक करतील असे अह्वान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आबासाहेब पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील राठोड यांनी नवोदित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऋषिकेश पाटील याने केले आणि आभार प्रा. राहुल निकम यांनी मानले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 17th Oct 2023 04:37 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 17th Oct 2023 04:37 pm













