शासनाची फसवणूक करत बेकायदेशीर उत्खनन व अतिक्रमण करणाऱ्या छाबडांवर कारवाई करावी; रयतराज संघटनेची मागणी

सातारा : शासनाची फसवणूक करत बेकायदेशीर उत्खनन व क्रशींग करून कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीपभाऊ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
नागेवाडी, लिंब खिंड सातारा या ठिकाणी हायवे पासून ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या घनशाम छाबडा यांच्या क्रेशरच्या माध्यमातून रोज लाखो रू. चे बेकायदेशीर क्रशिंग केले जाते. तेथे होणाऱ्या क्रशिंगमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना व वाहन धारकांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात तेथील नागरिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. क्रशिंग करण्याकरिता ग्रामपंचायतीची नाहरकत घेतली नाही विचारणा करायला गेल्यास तेथील नागरिकांनाच त्यांच्याकडून दम दिला जातो. असे बेकायदेशीर उत्खनन व क्रशिंग करता येत का.? आणि हे कायदेशीर असेल तर त्याला पोलुशन खात्यासहित इतर विभागाने परमिशन दिल्याच कशा? हा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
तरी नागरिकांना व वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून घनशाम छाबडा यांनी आत्तापर्यंत केलेल्या बेकायदेशीर उत्खनांचे व क्रशिंगची रॉयल्टी भरून घेऊन ते क्रशर ताबडतोब बंद करावे अन्यथा रयतराज संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
   तसेच घनश्याम छाबडा व महेश छाबडा यांनी सातारा शाहूपुरी, गुलमोहर कॉलनी या ठिकाणी दंडेलशाहीने सातारा नगरपालिका हद्दीतील रस्ता बंद करून त्या ठिकाणी स्वतःचे ऑफिस स्थापन केले असून हा रस्ता मोकळा करण्या करिता गेल्या अनेक वर्षापासून तेथील नागरिकांनी पूर्वी शाहूपुरी ग्राम पंचायत व आत्ता सातारा नगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही हा रस्ता खुला केला गेला नाही.
सदर जागेत छाबडा कुटुंबीयांनी अनेक वर्षापासून तेथील रस्ता अडवून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण ताबडतोप हटवावे व तेथील रस्ता नागरिकांच्या सोईसाठी खुला करावा अन्यथा रयतराज संघटनेच्या वतीने येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त