छ.उदयनराजे यांनी मनोज घोरपडे यांची कॉलर उडवून दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

छ.उदयनराजे यांनी मनोज घोरपडे यांची कॉलर उडवून दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

भाजपा कराड उत्तर विधानसभा निवडणूकप्रमुख मा. जिल्हा  मा. मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवस कराड उत्तरमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कराड उत्तर मतदार संघातील 6 ठिकाणी मोफत नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. दि. 26 रोजी मा. मनोजदादा घोरपडे यांनी मत्यापूर गावचे कुलदैवत हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

कुटुंबांतील महिलांनी त्यांचे औक्षण केले त्यानंतर पाली येथील खंडोबाला अभिषेक करण्यात आला यानंतर दुपारी 12  वाजल्यापासून कराड उत्तर मतदार संघातून हजारो कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी मत्यापूर येथे येण्यास सुरुवात झाली

मनोज दादांनी कराड उत्तरमध्ये जनसामान्यांच्यात मनात घर निर्माण केले असल्यानेच हजारो लोकांचा जनसमुदाय आज दादांच्या साठी मत्यापूरात उपस्थिती झाला.  

यावेळी मनोजदादा युवा मंचतर्फे शिंदेशाही घराण्यातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायक उत्कर्ष शिंदे मनोज दादांच्या कार्यकर्तृत्वावर गायलेले गीत ऐकून उपस्थितांनी एकच जल्लोष करत एकच वादा मनोज दादा घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला. नेमकं त्याचवेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे कार्यक्रमस्थळी आल्याचे दिसताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला. व वाढदिवस कार्यक्रमाचा माहोल पुरता बदलून गेला. व्यासपीठावर मनोजदादांसोबत केक कापून व दादांना केक भरवुन उदयनराजेंनी जनतेच्या वतीने दादांचा वाढदिवस साजरा केला. त्याप्रसंगी मनोजदादा यावेळी नक्कीच आमदार होणार असल्याचे उदयनराजेंनी मोठ्या विश्वासाने सांगितले.  

ज्यांच्या स्टाईलने राजकारणातील चाणक्य म्हटले जाणारे शरद पवार सुद्धा प्रभावित आहेत त्यांनीच उडवली मनोज दादांची कॉलर कार्यक्रमाची ठिकाणी उदयनराजे नेहमीच्या शैलेत स्वतःची कॉलर न उडवता मनोजदादांची कॉलर उडवून येणाऱ्या विधानसभेला मनोज दादाच आमदार असतील असे सांगितले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला