श्री सेवागिरी महाराज अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव येथे दिनांक 13 ते 15 भजन स्पर्धेचे आयोजन
निसार शिकलगार - Wed 7th Dec 2022 04:59 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मलीन तपोनिधी सिद्धहस्त श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधीस 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 13 ते 15 भजन स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव यांनी केले आहे. मंगळवार दिनांक 13 रोजी बालगट दिनांक 14 रोजी पुरुष गट व दिनांक 15 रोजी महिला गट असे स्पर्धेचे आयोजन केले असून बालगट, पुरुष गट, महिला गट प्रत्येक गटास अनुक्रमे बक्षीस प्रथम क्रमांक 17 हजार रुपये , 15 हजार रुपये 11 हजार व चतुर्थ क्रमांक सात हजार रुपये देण्यात येणार आहे. ही बक्षिसे पुसेगाव किराणामाल व्यावसायिक असोसिएशन पुसेगाव यांच्या वतीने देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघात आठ ते दहा जणांचा समावेश असावा, स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येतील, प्रथम फेरीसाठी वीस मिनिटे वेळ असेल, दोन अभंग व एक गवळण गायली पाहिजे, सादरीकरणामध्ये भजन मंडळातील कमीत कमी तीन लोकांनी गायन करणे गरजेचे आहे प्रथम फेरीतून गुनानुक्रमे दहा संघाची निवड केली जाईल, दुसऱ्या फेरीमध्ये पंधरा मिनिटे वेळ दिला जाईल, त्यात एक अभंग व गवळण गायली जावी, प्रथम व द्वितीय फेरीतील रचना वेगवेगळ्या असाव्यात यातून अंतिम संघाची निवड केली जाईल, परीक्षकाचा निर्णय अंतिम राहील,स्पर्धकांची भोजन व्यवस्था केली जाईल, तीनही गटाच्या दोन्ही फेऱ्या त्या दिवशी घेण्यात येतील, व्यावसायिक व रेडिओ स्टार यांना भाग घेता येणार नाही, दिनांक अकरा व बारा अखेर संघाची नोंदणी केली जाईल त्यानंतर येणाऱ्या संघाचा विचार केला जाणार नाही. भजन संघाचे नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक 9142260347 संपर्क साधण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 7th Dec 2022 04:59 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 7th Dec 2022 04:59 pm













