वर्णे-आबापुरी यात्रा आनंदात व उत्साहात पार पाडा : नायब तहसीलदार कोळेकर

देशमुखनगर : वर्णे- आबापुरी येथे श्री काळभैरवनाथ यात्रा पूर्व आढावा बैठकीस संबोधित करताना नायब तहसीलदार दयानंद कोळेकर  म्हणाले की ,वर्णे- आबापुरी यात्रा ही जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. कोरोना निर्बंध मुक्तीनंतर यात्रा भरत असल्याने ती आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पाडूया.यावेळी प्रशासनातील सर्व यंत्रणाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या,यावेळी कायदा व सुव्यवस्था तसेच   वाहतूक,वाहनतळ व्यवस्था इत्यादी बाबींचा आढावा  बोरगाव पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी  घेतला. आरोग्य सुविधा संदर्भात  प्राथमिक आरोग्य केंद्र अंगापूरचे  वैद्यकीय अधिकारी उमेश शेंडे यांनी मार्गदर्शन केले.रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच   महावितरण विभागामार्फत अखंडित वीजपुरवठा केला जाईल असे सातारा तालुका ग्रामीणचे  अभियंता श्री पांढरपट्टे यांनी सांगितले .यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे श्री शरद नरळे यांनी अवैध दारु विक्री होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. अन्न पदार्थांची भेसळ होणार नाही यासाठी आवश्यक त्या सूचना व्यापारी प्रतिनिधीना दिल्या जाव्यात. सातारा आगार प्रमुख श्रीमती रेश्मा गाडेकर यांनी  बोरगाव ,सातारा, कोरेगाव या ठिकाणांहून भाविकांच्या वाहतुकीसाठी आवश्यक त्या जादा गाड्या सोडण्यात येतील असे सांगितले. भाविकांनी एस.टी.सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.  यात्रेकरुना शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होईल असे देशमुख यांनी आश्वासित केले.
.सातारा पंचायत समिती बांधकाम विभागाने वर्णे- आबापुरी हा रस्ता पाठपुरावा करुनदेखील दुरुस्त  न केल्याने  पंचायत समितीचे माजी सदस्य प्रविण धस्के यांनी नाराजी व्यक्त केली.तसेच गेल्या दोन वर्षात  वर्णे- अपशिंगे रस्त्यावरील धोकादायक वळणावर दोन युवकांना प्राण गमवावा लागल्याने वळणात रस्त्यालगतची  जंगली झाडी झुडपे काढून साईड पट्टी भरणे बाबत मागणीही यावेळी  त्यांनी केली . यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन प्रवीण पवार सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय पवार, किशोर काळंगे,रजत भस्मे,अजित यादव, तंटा मुक्तीचे अध्यक्ष  सदाशिव काळंगे,विश्वस्त बळवंत काळंगे, सुरेश पवार, उद्धव पवार,शंकरराव पवार,  हणमंतराव पवार,मंडल अधिकारी बेसके,गाव कामगार तलाठी श्रीमती कोळी,  ग्रामसेवक अनिल कंठे उपस्थित होते.माजी सरपंच विजय पवार यांनी आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त