समीरच्या सोबतीला आता काझी; पोलीस करतायत त्यांचीच हा..जी... हा..जी
सातारा शहरासह उपनगरात हिरव्या नेटमागे मटक्याचा खेळ चाले
मंगेश कुंभार- Sat 17th May 2025 05:59 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा पोलिसांचा तथाकथित जावई, मटकाकिंग समीर कच्छीवर सध्या २०० हुन अधिक मटका/जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खुनासाठी अपहरण, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, गर्दी, मारामारी, फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांची यादी सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कुंडलीत नोंद आहे. परंतु, अशा या कुप्रसिद्ध गुंडासाठी साताऱ्यातील पोलीस समीर कच्छीची हा..जी... हा..जी करताना दिसत आहेत.
सातारा शहरासह उपनगरांमध्ये भररस्त्याकडेला हिरव्या नेट असून हा मटक्याचा गोरखधंदा चालवला जात आहे. मात्र साताऱ्यातील सतर्क पोलिसांचे याकडे लक्ष जात नाही, हि दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. सातारा शहर आणि उपनगर परिसरात शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे अवैध धंदे सुरु आहेत. मात्र सातारा पोलीस दलातील अतिकर्तव्यदक्ष पोलिसांनी मंथली हप्ता ठरवून घेत अशा अवैध धंद्यांना कायदेशीर संमतीच दिली आहे.
महाराष्ट्राभर आपले अवैध बस्तान बसवलेल्या मटकाकिंग समीर कच्छीने आख्ख पोलीस दलच आपल्या मागच्या खिशात घेऊन फिरत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांचे पॅकेज ठरले असून पोलीस दलातील कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच हात बरबटले आहेत. त्यातच आता समीर कच्छीच्या साथीला शाहरुख काझी आल्याने मटका टोळीचा माफिया राज साताऱ्यात पाहायला मिळत आहे. एक आत गेला तर दुसरा टोळी सांभाळत असल्याची माहिती मिळत असून त्याचे चेले हे सगळे अड्डे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकावर टिच्चून चालवत आहेत. परंतु पोलिसच मिलीभगत असल्याने उघड्या डोळ्यांनी बघण्यापलीकडे त्यांच्यापुढे पर्याय उरत नाही.
त्यामुळे अगदी सातारा शहरातल्या गोडोली तळे येथील पोलीस चौकीसमोर सुसाट असलेला मटक्याचा अड्डा याचीच साक्ष देतो. त्याचबरोबर सातारा शहरातील नगरपालिका समोर, राधिका रोड, मोळाचा ओढा, बुधवार नाका, करंजे नाका, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, सदरबझार, वाढे फाटा, कोरेगाव रोड, अजंठा चौक, रहिमतपूर रोड, कोडोली, एमआयडीसी यासह असंख्य ठिकाणी मटका आणि जुगार अड्डे खुलेआम सुरु आहेत. समीर कच्छी आणि शाहरुख काझीने मटका व्यवसायात हातमिळवणी केल्यामुळे अवैध व्यवसायाचे जाळे जिल्हाभर पसरले आहे. शहरासह ग्रामीण भागांत अवैध धंद्यांचे मांडलेले बस्तान उध्वस्त करायचे असेल तर समीर कच्छी सारख्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराला पुन्हा मोक्का लावत अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यापुढे आव्हान असेल.
क्रमशः
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sat 17th May 2025 05:59 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 17th May 2025 05:59 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 17th May 2025 05:59 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 17th May 2025 05:59 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 17th May 2025 05:59 pm
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Sat 17th May 2025 05:59 pm
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Sat 17th May 2025 05:59 pm
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Sat 17th May 2025 05:59 pm
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Sat 17th May 2025 05:59 pm
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Sat 17th May 2025 05:59 pm
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Sat 17th May 2025 05:59 pm
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Sat 17th May 2025 05:59 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Sat 17th May 2025 05:59 pm













