विधवा महिलांना हळदी- कुंकू लावून अनोखी पध्दतीने सोहळा संपन्न ;

जिहे  : सातारा जिल्ह्यातील जिहे गावी अनिष्ट विधवा  प्रथा निर्मूलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला  ;यावेळी महिलांना सन्मानित करण्यात आले; विधवा बहिणींना साडी,चोळीची रक्षाबंधन भेट देत; विधवा महिलांना हळदी- कुंकू लावून अनोखी पध्दतीने सोहळा पडला पार,]
सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील जिहे या गावी ग्रामपंचायत जिहे आणि ग्रामस्थांच्या वतीने  जिहे या गावी जानाईदेवी मंदिरात महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.त्याचबरोबर गावातील महिलांनी या सोहळ्याला चांगला प्रतिसाद दिला.यासोहळ्याला विशेष मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर  श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासू माजी जिल्हा परिषदेचे सदस्य जिहे गावचे सुपूत्र कै‌.सुनिल भाऊ सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी जर्नादन घाडगे गुरुजी बोलताना म्हणाले, सुनिल भाऊंनी माणसं कमावली त्यांची समाजाशी असलेली नाळ ही आम्हाला त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली अलोट गर्दी पाहून समाजली.. जिहे येथील कार्यक्रमाची सुरुवात "हम होंगे कामयाब"या स्फूर्तीगीताने करण्यात आली.जिहे गावातील अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलन सोहळा उत्साहात पार पडला असून जिहे गावातील विधवा महिलांना
हळदी -कुंकू लावण्यात आले. तसेच विधवा महिलांना साडी,चोळीचे वाटपही करण्यात आले. 
विशेष मान्यवरांच्या हस्ते  रक्षाबंधन भेट देण्यात आली.प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर प्रमुख वक्त्या ॲड शैलाताई जाधव, दानशूर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद मुळे,पियूष जोशी, महिला सक्षमीकरण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षला  सोनवणे यांनी महिलांना कर्तव्यासंबंधी संबोधित केले.या कार्यक्रमाला 


ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समितीच्या पद्मा बर्गे , नम्रता बर्गे , सुषमा डांगे , अमोल पांढरपट्टे , महिला सक्षमीकरण फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षला सोनवणे , प्राजक्ता चव्हाण ,मंगलाधिष पाठकजी , शंकरराव फडतरे ,भगवान कुंभार , प्रल्हाद जाधव ,दिलीप जाधव , सतीश जाधव , माधव कुलकर्णी , माजी सरपंच विजया फडतरे , विठ्ठल फडतरे , तलाठी गुंजवटे आणि ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.जिहे गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 
जनार्दन घाडगे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले तसेच सौरभ भोईटे यांनी आभाप्रदर्शन केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त