श्रीमती बाईनाबाई गायकवाड यांचे निधन

सातारा : नांदवळ ता. कोरेगाव जिल्हा सातारा येथील श्रीमती बाईनाबाई बुवाजी गायकवाड वय -७२ यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.  सायगाव ता. जावली हे त्यांचे माहेर होते. आपल्या बंधूंनी उच्च पदस्थ अधिकारी व्हावे. यासाठी त्यांनी खूप मोठे कष्ट घेतले होते. त्यामुळेच त्यांचे बंधू यशस्वी अधिकारी  बनले होते.श्रीमती बायनाबाई या भीम गीतांच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होत होत्या. तसेच त्यांना आंबेडकरी चळवळीतील अनेक घडामोडी याची माहिती होती. भीम गीताच्या गाण्यामुळे त्यांनी अनेक गावात कार्यक्रम केले होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सूना ,नातवंड, विवाहित मुली- जावई असा मोठा परिवार आहे. दलित सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रेमानंद जगताप- सायगावकर यांच्या त्या आत्या होत. रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी नांदवळ ता कोरेगाव या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता बौद्ध पद्धतीने त्यांच्या जलदान  विधी व शोक सभा होणार असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र मनोहर व सतीश गायकवाड यांनी दिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त