हिंगनोळेत मादी बिबट्या अन् पिल्लांचे वन विभागाकडून पुनर्मिलन
Satara News Team
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
- बातमी शेयर करा
कराड : कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील शेतकरी सौ. विद्या निवासराव माने यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड सुरू असताना सोमवारी (दि. 18) दुपारी बिबट्याची दोन पिल्ले सरीत आढळून आली होती. या घटनेची माहिती वनपाल सागर कुंभार यांना समजताच घटनस्थळी जाऊन त्यांनी पिल्ले ताब्यात घेतली. सदर बिबट्याची पिल्ले ही नवजात होती व अजून डोळे उघडायची होती. मादी बिबट्या ही जवळपासच असणार हे ओळखून वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या टीमच्या मदतीने रात्री 7.30 वाजता मादी व पिल्लांचे पुनर्मिलन घडवून आणले. या पुनर्मिलनची दृश्ये वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कराड तालुक्यातील हिंगनोळे गाव परिसरातील ऊसाच्या शेतात आढळलेल्या मादी बिबट्याच्या नवजात पिल्लांचे व मादीचे पुनर्मिलन वन विभागाने घडवून आणले. या भेटीतून प्राण्यांमधील मातृत्वाचे दर्शन घडले आहे. आपल्या नवजात बछड्यांना सोडून अन्नाच्या शोधात गेलेली मादी बिबट्या हि पुन्हा रात्री परतली आणि ती आपल्या बछड्यांचा सुखरूप परत घेऊन गेली. हे सर्व कार्य वनविभागाने रावबिलेल्या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे पार पडले आहे.

मादी बिबट्या व पिल्लांच्या पुनर्मिलापाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनक्षेत्रपाल परिविक्षाधीन सुजाता विरकर ,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटेसह सदर कारवाईमध्ये वनपाल सागर कुंभार , वनरक्षक सचिन खंडागळे, मेजर अरविंद जाधव, वनसेवक शंभूराज माने यांनी सहभाग घेतला. वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर्सचे अजय महाडीक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार , अनिल कोळी, सचिन मोहिते यांनी वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 19th Mar 2024 03:51 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 19th Mar 2024 03:51 pm













