एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या महाराष्ट्र राज्य  सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

मसूर : एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या महाराष्ट्र राज्य  सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सातारा येथे नुकताच संपन्न झाला.
       यावेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदचे प्रमुख समन्वयक श्री. योगेशजी पाटील, संस्थेचे सहसमन्वयक श्री. प्रकाशराव महाले, पुणे विभाग महिला समन्वयक श्रीमती भक्तीताई जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.विक्रम जाधव, बी व्ही जी चे संचालक श्री. संदेश पोतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
     यावेळी श्री. योगेशदादा पाटील यांनी राष्ट्रीय सरपंच संसद- एम आय टी चे स्वरूप आणि त्याचे कार्य तसेच उद्योग जगतातील सेसफंड ग्रामपंचायतींना कशा पद्धतीने वर्ग करता येईल या विषयी मार्गदर्शन केले. भक्तीताई जाधव यांनी महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सरपंच संसद एम आय टी च्या माध्यमातून महिलांना गाव पातळीवर कशा पद्धतीने काम करता येईल हे त्यांनी त्यांच्या प्रेरणादायी भाषणातून व्यक्त केले. श्री. प्रकाशराव महाले साहेबा यांनी शेती विषयक अभ्यासूपणे संवाद साधला, 
        यावेळी कराड तालुका समन्वयक श्री. प्रशांत पाटील यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त भाव, बाजारपेठ मिळण्यासाठी एम आय टी च्या माध्यमातून शेतकरी सक्षम करता येईल का या दृष्टीने सुद्धा एम आय टी ने काम करावे असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय सरपंच संसद एम आय टी च्या स्वातीताई चव्हाण,  अनिताताई जाधव, प्रतिभाताई शिर्के, स्वातीताई ढाणे, वैशालीताई भिलारे, पत्रकार मिलिंदाताई पवार यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. 
      कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. स्वागत स्वातीताई चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक एम आय टी सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. विक्रमसिंह जाधव यांनी केले. आभार एम आय टी सातारा जिल्हा महिला संघटक अनिताताई जाधव यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला