पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या जागतिक फादर्स डे चे आयोजन

औंध : औंध येथे दिनांक १८ जून २०२३ रोजी अनोखा "फादर्स डे" साजरा करण्यात आला. वडील आणि मुलांमधील नातं खूप खास असतं हे नातं अधिक खास करण्यासाठी आपण दरवर्षी फादर्स डे साजरा करतो. पण कोणत्याही एका दिवशी फादर्स डे साजरा करावा इतकी अल्प व्याख्या वडीलांची नसून आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा वडीलांमुळेच असल्याची जाणीव असणे आवश्यक आहे.
    कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आणि जीवनाला आधार आणि आकार देणारे हात म्हणजे ईश्वरासमान तीर्थरूप वडील असतात. आधुनिक युगात बदलत चाललेले नात्यांचे स्वरूप धोकादायक आहे. याची जाणीव नवीन पिढीने ठेवावी व नाती टिकवण्याचा प्रयत्न करावा.अशा प्रकारचा अभिनव संदेश राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. सुखदेव भोसले यांनी आपल्या ८० वर्षे वय असणाऱ्या वडिलांना "फादर्स डे" निमित्त शुभेच्छा देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या दिनानिमित्त दहा झाडांचे वृक्षारोपण करण्याचा एक नवीन संकल्प केला आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला