सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर रेल्वे पोलिसांनी अमरावतीतील लव जिहाद प्रकरणातील युवतीला ताब्यात

अमरावती लव्ह जिहाद प्रकरणातील युवती सापडली सातार्‍यात ताब्यात

सातारा : अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका महाविद्यालयीन युवतीला फूस लावून पळवून नेवून तसेच तिचे ब्रेन वॉश करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील वातावरण स्फोटक बनले होते. याच धर्तीवर आज रात्री उशिरा संबंधित मुलगी सातारा येथील रेल्वे स्थानकात सापडली असून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका युवतीचे अपहरण करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. विवाहानंतर संबंधित मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात आणावे, अशी मागणी केली होती. हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्यामुळे या प्रकरणात स्थानिक खासदार नवनीत राणा तसेच राज्य सभेचे खासदार अनिल बोंडे यांनी उडी घेतल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले होते. आज दुपारी खासदार राणा यांनी पोलीस ठाण्यात जावून पोलिसांशी हुज्जत घातली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न लावून दिल्याचा आरोपही राणा यांनी केला होता. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच आज रात्री उशिरा सातारा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पीडित युवतीस ताब्यात घेतले आहे. संबंधित युवतीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सहा तासांचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता. तसेच यासंदर्भात माहिती देण्याचेही पोलिसांनी टाळल्याने याबाबतची सखोल माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतू गेल्या काही दिवसांपासून अमरावतीसह राज्यभरात चर्चिले गेलेल्या लव्ह जिहाद चा गौप्यस्फोट सातार्‍यात झाल्याने संबंधित युवती तसेच संशयिताची विचारपूस केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती मिळणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला