परभणी येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत फलटण चा शुक्रवार तालीम चा पैलवान ओम संजय शिर्के प्रथमक्रमांकाने विजयी.
राजेन्द्र बोंद्रे
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
- बातमी शेयर करा
फलटण: परभणी येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू आले होते .62kg गटात शुक्रवार तालीम मंडळ चा पैलवान ओम संजय शिर्के राहणार चौधरवाडी. याने प्रतिस्पर्धी खेळाडू वर 10, गुणाने मात करुन एक ही गुण प्रतिस्पर्धी खेळाडू ला मिळू दिला नाही.या त्याच्या यशाचे कौतुक करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात विशेष कौतुक केले.या वेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांनी सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
फलटण तालुक्याची कुस्ती या क्षेत्रांत संपूर्ण महाराष्ट्रात फलटण तालुक्याचा दबदबा आहे. कारण मागील काळात दोन महाराष्ट्र केसरी श्री बापूराव लोखंडे आणि गोरख सरक मिरगाव यांनी आपल्या तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.इथून पुढे ही महाराष्ट्र केसरी ची परंपरा कायम चालु राहण्यासाठी मी सदैव मदत करण्यास बांधील राहील . आणि असेच यश संपादन करुन शुक्रवार तालीम मंडळ आणि पैलवान ओम संजय शिर्के यांना आपल्या तालुक्याचे नाव उज्जवल करावे.पुढील यशासाठी शुभेच्छा देऊन सर्वांचेच कौतुक यावेळी केले. पैलवान ओम यास शुक्रवार तालीम मंडळ आणि, वस्ताद राहुल सरक यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. ओम शिर्के हा मोगराळे विद्यालय मोगराळे या शाळेचा विद्यार्थी आहे.
या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष.
अमोल सस्ते. शुक्रवार तालीम चे माजी अध्यक्ष आबा बेंद्रे. अध्यक्ष फिरोज आतार. राजाभाऊ देशमाने,आणि इतर पैलवान उपस्थीत होते
#ranjeetsinhanaiknimbalkar
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Tue 22nd Oct 2024 12:41 pm











