सोन्याच्या राणीहारचा मोह पडला भारी; दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या महिलेसह सराफ ताब्यात
Satara News Team
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
- बातमी शेयर करा
सातारा ; यात्रेसाठी घराला कुलूप लावून गेलेल्या एकाकुटुंबातील बंद घरात घुसून सोन्याचा राणीहार आणि 16 हजारांची रोकड चोरून नेण्याची घटना गट आठवड्यात घडली होती. या प्रकरणी सातारा येथील शाहूपुरी पोलिसांनी तपास करीत एका महिलेसह सराफाला ताब्यात घेतले आहे. तसेच सोन्याचा राणीहारसह 16 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 10 एप्रिल रोजी सातारा शहरातील रामाचा गाेट येथील एक कुटुंब यात्रेसाठी घराला कुलूप लावून चावी शेजारी ठेवून गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेला सोन्याचा 2.5 तोळे वजनाचा राणीहार आणि 16 हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला होता.
याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानंतर पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांना सूचना केलेली. या सूचनेनंतर पथकाने चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा यापूर्वी चोरीची तक्रार नोंद असणारी एक महिला अपार्टमेंटमध्ये राहण्यास आल्याचे समजले. त्यामुळे संबंधित महिलेकडे चाैकशी केल्यावर प्रथम चुकीची उत्तरे मिळाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी काैशल्यपूर्वक परिस्थिती हाताळत संबंधित महिलेकडून चोरीची माहिती मिळवली. त्यावेळी तिने चोरीची कबुली दिली. तसेच सोन्याचा राणीहार गहाण ठेवल्याचेही सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी 16 हजारांची रोकड हस्तगत केली. त्याचबरोबर राणीहारही ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि सराफासही ताब्यात घेत अधिक चाैकशी सुरू केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये हवालदार लैलेश फडतरे, चंद्रकांत माने, सचिन माने, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्नील पवार, माधुरी शिंदे, शुभांगी भोसले, कोमल पवार, तनुजा शेख आदी सहभागी झाले होते.
स्थानिक बातम्या
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
संबंधित बातम्या
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
-
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sat 15th Apr 2023 06:57 pm
-
पुसेगावमध्ये गॅस कटरने ATM मशीन फोडून ६ लाख ६१ हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्हीचेही केले नुकसान
- Sat 15th Apr 2023 06:57 pm












