खटाव तहसीलदार म्हणजे कर्तव्यदक्ष आणि गरिबांची जाण असलेले अधिकारी.- मा.विजय घार्गे.

खटाव  : वडगाव जयराम स्वामी येथील अनेक शेतकर्यांना पी.एम. किसान सम्मान निधी योजनेचा सुरवातीचे हप्ते हे मिळाले आहेत. परंतु त्यानंतर काही शेतकऱ्यांचे हप्ते हे काही कारणामुळे बंद झाले आहेत. त्याचे कारण लोकांना समजत नाही. तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक, तसेच काही लोकांनी प्रत्यक्ष तहसीलदार कार्यालयाला तक्रार करूनही त्यावर योग्य ती कार्यवाही झाली नाही. आता काही दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाचा हप्ता जमा होणार असुन त्या हप्त्यास वडगाव जयराम स्वामी येथील बरेच शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी त्या शेतकर्यांचा आपल्याकडून योग्य ती कार्यवाही होऊन त्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. अशा आशयाची कैफियत सुमारे १५० शेतकऱ्यांनी समक्ष उपस्थित राहुन दस्तुरखुद्द तालुका दंडाधिकारी तथा खटाव तालुक्याचे तहसीलदार मा. प्रशांत जाधव यांच्या समोर मांडली. 
         यावेळी तातडीने खटावचे तहसीलदार मा.प्रशांत जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कैफियत घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दुर करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. शिवाय कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास समक्ष उपस्थित राहुन मला सुचित करावे, मी आपल्या सेवेसाठी कायम तत्परतेने जबाबदार आहेच असे सांगितले. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सदरचे अधिकारी हे कर्तव्यदक्ष तर आहेतच शिवाय गोरगरिबांची जाण असणारे असल्याची भावना व्यक्त केली.
          या शेतकऱ्यांचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते मा. विजय घार्गे, मा. विशाल पवार, मा. विजय पवार, ज्येष्ठ नागरिक मा.शिवाजी कुंदप, मा.मधुकर कांबळे, मा. सुभाष भोसले, मा. विठ्ठल घार्गे, मा. तुकाराम पवार, मा. हरिश्चंद्र जाधव, आसिफ मुलाणी यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त