देवदूत सागर दादा पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

अपघातग्रस्त महिलेला भारतीय मराठा महासंघाचे सागर दादा पवार यांच्याकडून आर्थिक मदत

सातारा : भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सागर पवार यांनी खंडाळा तालुक्यातील अहिरे गावांमधील अपघातग्रस्त महिलेच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराबाबत व त्या कुटुंबाची हालाखीची सत्य परिस्थिती पाहिली आहे. कुटुंबाकडून त्यांची परिस्थिती त्यांच्या तोंडून ऐकून दादांचे मन स्तब्ध झाले. त्यांची अवस्था पाहून सागर दादा यांनी त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सागर दादा पवार यांनी त्या कुटुंबाला सांगितले की, तुम्हाला कोणतीही प्रकारची कोणती अडचण किंवा कोणतीही समस्या आल्यास 24 तास तुमच्या मदतीसाठी मी तत्पर आहे. प्रत्यक्ष येऊन किंवा माझा कार्यकर्ता पाठवून तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही कोणताही संकोच बाळगू नका, मी तुमच्या पाठीमागे भावासारखा किंवा मुलासारखा तुमच्या पाठीमागे उभा आहे. अशा त्या शब्दांनी कुटुंबाला साक्षात सागर दादाच्या रूपात देवाचे दर्शन झाले. कुटुंबातील व्यक्तीने त्यांच्या आभार मानले आणि कुटुंबाला जगण्याची नवी उमेद निर्माण झाली की कोणीतरी माणुसकी जपत आहे. आपल्या कोणत्याही संकट किंवा वाईट वेळ आली तर सागर दादा आपल्या पाठीशी आहेत, असे त्यांना समजले आहे.
  यावेळी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सागर दादा पवार, जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ, कामगार जिल्हा अध्यक्ष संतोष ननावरे, तालुकाध्यक्ष अतुल भोईटे, महिला जिल्हा संघटक मोहिनी लोंढे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सपना भोसले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनिता कोकरे, तालुका उपाध्यक्ष तुषार शेंडगे व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला