व्याहळी कॉलनी महेश थोरवे यांचे एमपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश.
Satara News Team
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
- बातमी शेयर करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षा आणि मुलाखत यानंतर अंतिम उमेदवारांच्या नावाची यादी आणि पात्रता गुण (कटऑफ ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले.
या परीक्षेत व्याहळी कॉलनी गावातील श्री. महेश शामराव थोरवे यांनी उज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवले . महेश यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाई मध्ये केले तर उच्च माध्यमिक शिक्षण वाय सी कॉलेज सातारा येथे झाले . पदवि बी. इ इन्स्ट्रुमेशन इंजीनियरिंग मुंबई येथे केले . लहानपणापासूनच अधिकारी व्हायचं आहे , हे मनाशी ठाम बांधून पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. कोणताही खाजगी क्लास न लावता आपली नोकरी सांभाळत मिळेल त्या वेळेस ग्रंथालयामध्ये अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवले. त्यांना अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये संधी काही गुणांसाठी हुकवत होती मात्र निराश न होता त्याचे प्रयत्न सातत्याने चालू होते. बुधवारी दहा एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. महेश अकरावीला असताना पितृछत्र हरपले. मात्र या अडचणीच्या काळात त्यांच्या आई प्राथमिक शिक्षिका व जिल्हा परिषद शाळा एकसर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती शामराव थोरवे व त्यांचे संपूर्ण कुटुंब भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले. अपयश आले तरी न डगमगता जिद्द,चिकाटी,मेहनत, सातत्य व प्रामाणिकपणा याच्या जोरावर महेश यांनी यश संपादन केले. त्यांचे वडील स्वर्गीय शामराव रंगराव थोरवे यांची इच्छा होती की आपल्या मुलाने अधिकारी व्हावे ती इच्छा आज पूर्णत्वास आली.त्यांच्या यशाची बातमी समजताच व्याहळी कॉलनी ग्रामस्थ, त्यांचे कुटुंब व नातेवाईक यांनी आनंद उत्सव साजरा केला.या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
संबंधित बातम्या
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
-
तापोळा मंडलात शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत वारस फेरफार अदालत आयोजित
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
-
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
-
महाबळेश्वर रस्त्यालगतची केबल खोदाईत झाडे असुरक्षित
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
-
पाचगणीत मूलभूत सुविधा कोमात; मात्र अत्याधुनिक सुविधा जोमात
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
-
पुसेसावळी संपूर्ण शहर सीसीटीव्ही कक्षेत, प्रक्षेपण थेट पोलिस अधिक्षकांकडे असून फायदा काय?
- Thu 11th Apr 2024 12:37 pm
-
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या आदेशाला पांचगणी मुख्याअधिकारी निखील जाधव यांच्याकडुन वाटाण्याच्या अक्षता
- Thu 11th Apr 2024 12:37 pm