पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

पुसेसावळी : पुसेसावळी आणि आसपासच्या भागात सुरू असलेल्या मटका, गुटखा, जुगार, अवैध दारू, गौणखणिज वाहतूक, गांजा विक्री सारख्या अवैध धंद्यांच्या प्रश्नावर आता 'पोलिस कारवाई' हा कळीचा मुद्दा ठरला आहे. गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांकडून सुरू होणारी कारवाई रूपी पावले, त्यातील सातत्य आणि यंत्रणेची जबाबदारी याबाबत नागरिकांमध्ये मते आणि अपेक्षा दबक्या आवाजात व्यक्त होत आहेत.

       ​पोलिस कारवाईकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलत आहे. तात्पुरत्या धाडींपेक्षा सातत्य गरजेचे असल्याचे दिसून येते.अनेकदा एखाद्या ठिकाणी अचानक कारवाई झाल्यानंतर काही दिवस शांतता राहते; मात्र त्यानंतर पुन्हा जुनेच प्रकार जोमाने सुरू होतात, अशी खंत नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे अधूनमधून कथित संगनमताने होणाऱ्या धाडींपेक्षा नियमित आणि सातत्यपूर्ण गस्त व कारवाई आवश्यक असल्याचे मानले जाते. केवळ छोटे-मोठे अड्डे किंवा वरवरची कारवाई न करता, या धंद्यांचे अर्थकारण सांभाळणारे आणि पडद्यामागून सूत्रे हलविणारे मुख्य घटक शोधून सूत्रधारांपर्यंत पोहोचत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी चर्चा ही जोर धरू लागली आहे.

         स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित पोलिस ठाण्याचे "जाणकार" यांच्यात विश्वास आणि थेट संवाद वाढल्यास अवैध व्यवसायांची माहिती जी संबंधित अधिकाऱ्यांना पहिल्यापासूनच असते परंतू गोपनीय किंवा खास बातमीदार म्हणून ज्यांचा उल्लेख इतर वेळी कथित मॅनेज कारवायांमध्ये आढळून येतो. त्यांचेकडून वेळेत मिळून कारवाई अधिक प्रभावी होऊ शकते.

       ​पुसेसावळीसह परिसरातील वाढती वर्दळ आणि भौगोलिक स्थिती पाहता, येथे कोणताही बेकायदेशीर व्यवसाय फोफावू नये यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणेने अधिक सजग राहण्याची अपेक्षा व्यक्त होते. अवैध धंद्यांवर जरब बसवायची असेल, तर गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय मोडून काढणे आणि कायद्याचा धाक निर्माण करणे हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सार्वसामान्य जाणकारांचे मत आहे.​"अवैध धंद्यांवर ठोस आणि निर्भीड पोलिस कारवाई झाली तरच सामान्य माणसाला सुरक्षित वाटते; कायद्याची जरब असेल तरच चुकीच्या गोष्टींना आळा बसतो," त्यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

 पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

 पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म

पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला